ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक आणि कवी नामदेव धोंडो महानोर यांचे निधन !

नामदेव धोंडो महानोर

पुणे – ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक आणि कवी नामदेव धोंडो महानोर (वय ८१ वर्षे) यांचे ३ ऑगस्‍ट या दिवशी सकाळी निधन झाले. येथील रुबी हॉल रुग्‍णालयात त्‍यांच्‍यावर उपचार चालू होते. त्‍यांनी अनेक काव्‍यसंग्रहांसह चित्रपटांसाठीही गीते लिहिली. ४ ऑगस्‍टला पळसखेड या त्‍यांच्‍या गावी अंत्‍यसस्‍कार करण्‍यात येणार आहेत.

‘अजिंठा’, ‘गंगा वाहू दे निर्मळ’, ‘जगाला प्रेम अर्पावे’, ‘दिवेलागणीची वेळ’ हे त्‍यांचे कवितासंग्रह लोकप्रिय ठरले. यासह ‘गपसप’, ‘गावातल्‍या गोष्‍टी’ हे कथासंग्रहही वाचकांना आवडले. महानोर यांच्‍या कवितांनी बालकवी आणि बहिणाबाई यांचा वारसा समृद्ध केला.