मूल्यवर्धित कर विभागातील अधीक्षक आणि निरीक्षक यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक !

मूल्यवर्धित कर विभागातील (जी.एस्.टी.) अधीक्षक महेश नेसरीकर आणि निरीक्षक अमित मिश्रा यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे.

३ लाख रुपयांची लाच घेतांना संभाजीनगर महापालिकेच्या गुंठेवारी कक्षप्रमुखांना अटक !

यावरून महापालिकेत भ्रष्टाचार किती मुरला आहे, हे स्पष्ट होते. महापालिकेत खालपासून वरपर्यंत असलेल्या भ्रष्टाचाराच्या साखळीत संबंधित दोषी वरिष्ठ अधिकार्‍यांनाही अटक केली पाहिजे.

साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस नाईक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !

गुन्ह्याच्या अन्वेषणात साहाय्य करण्यासाठी तक्रारदाराकडे २५ सहस्र रुपयांची लाच मागितली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस नाईक यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

भ्रष्टाचार करणार्‍यांपैकी काही जणांना कठोर शासन केले, तर भ्रष्टाचार बंद होईल ! घर क्रमांक नसलेल्या घरांना ‘घर क्रमांक’ देण्याची प्रक्रिया राबवतांना सतावणूक होणार नाही, असे आधीच का करत नाही ?

एखादी पंचायत ‘घर क्रमांक’ देण्यासाठी नागरिकांकडून विनाकारण निरनिराळी कागदपत्रे किंवा पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी त्याविषयी लेखी तक्रार करावी.

महाराष्ट्रात बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा सुळसुळाट !

इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्रे सिद्ध होत असतांना प्रशासन झोपा काढत होते का ? यातील उत्तरदायींना सरकारने तात्काळ दंडित करावे आणि त्यांची संपत्ती जप्त करावी ! 

सरकारी यंत्रणेतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून प्रतिवर्षी जनतेच्या कोट्यवधी रुपयांची लूट !

इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतांना गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई न करणारा एकमेव देश भारत ! भ्रष्टाचार शून्य कारभारासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !

खासदार नवनीत राणा यांचे आतंकवादी दाऊदशी संबंध असलेल्या युसूफ लकडावाला याच्याशी आर्थिक संबंध !

राणा यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शक्तीचा महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न !

कोटकामते ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचांना ३६ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी पोलीस कोठडी  

ग्रामपंचायत हा केवळ गावाच्या नव्हे, तर देशाच्या विकासाचा पाया असतो. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवक प्रामाणिक असतील, तरच हा पाया भक्कम होऊ शकतो. याचे भान लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी ठेवायला हवे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शासकीय पैशांचा अपहार केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश !

चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा दिल्यासच पुढे असे कुणी करणार नाही.

राजकारण्यांचा ‘धंदा’ !

भुजबळांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती कोणत्या धंद्याद्वारे मिळवली, हे सर्वसामान्य जनतेला ठाऊक नाही’, असे कसे म्हणणार ? ‘राजकारण्यांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती कोणत्या धंद्यातून त्यांना मिळते ?’ जनतेला याचे उत्तरही ठाऊक आहे; मात्र जनता ते सिद्ध करून दाखवू शकत नाही, असा ‘प्रामाणिक धंदा’ हे राजकारणी करत आहेत !