पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शासकीय पैशांचा अपहार केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश !

पिंपरी-चिंचवड (पुणे) – शासकीय पैशांचा अपहार करणे, कर्तव्यात कसूर करणे आणि नागरिकांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील प्रियंका शिंदे अन् दीपाली जगदाळे यांची बीट निरीक्षकांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी २६ एप्रिल या दिवशी दिले आहेत.

पालिकेच्या सामान्य पावत्यांमध्ये फेरफार करून शासकीय पैशांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, तसेच कार्यालयामध्ये आलेले नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी उद्धटपणे वागतात, अशा तक्रारी त्यांच्या विरोधात करण्यात आल्या होत्या. (चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा दिल्यासच पुढे असे कुणी करणार नाही. – संपादक)