लाच स्वीकारतांना बारामती (पुणे) येथील हवालदार आणि होमगार्ड यांना अटक !

अटक नोटिसीमध्ये (वॉरंट) अटक न करण्यासाठी आरोपीकडून लाच स्वीकारतांना बारामती शहर पोलीस ठाण्यातील हवालदार अण्णासाहेब उगले आणि होमगार्ड सनी गावडे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांना अटक !

सरकारने अशांना केवळ अटक करून थांबू नये, तर त्यांची सर्व संपत्तीही जप्त केली पाहिजे !

संभाजीनगरला पाणी मिळाल्याविना आमचा जल आक्रोश संपणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

हा मोर्चा भाजपचा नसून यात तमाम संभाजीनगरवासीय सहभागी आहेत. त्यामुळे संभाजीनगरला पाणी मिळाल्याविना आमचा जल आक्रोश संपणार नाही, अशी चेतावणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर ‘सीबीआय’च्या धाडी !

देहली, पाटलीपुत्र आणि गोपालगंज येथील ठिकाणांवर धाडी ! यादव यांनी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्रीपदी असतांना लोकांना नोकर्‍या देण्यासाठी लाच म्हणून भूखंड स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

पारवा (जिल्हा यवतमाळ) येथे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या !

जिल्ह्यातील पारवा या गावात महादेव मंदिराजवळ १६ मे या दिवशी अनिल ओचावार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली.

चौकशीसाठी नगररचना विभागाकडून टाळाटाळ ! : नाशिक येथील म्हाडा घोटाळ्याचे प्रकरण

महापालिका क्षेत्रामध्ये गरिबांना सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या सदनिकांच्या हस्तांतरणात घोटाळा झाला होता. त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. याविषयीचा प्रत्यक्ष स्थळ पहाणीचा अहवाल दिला जात नाही.

‘गोवा मेडिकल कौन्सिल’मध्ये अपप्रकार आणि सरकारचा हस्तक्षेप !

‘गोवा मेडिकल कौन्सिल’ सध्या अटी आणि नियम यांच्याप्रमाणे कार्य करत नाही. परिषदेतील अपप्रकारांमध्ये वाढ झाली आहे तसेच वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या; परंतु अनुभव नसलेल्या आधुनिक वैद्यांची प्रमाणपत्राविना नोंदणी केली जात आहे.

बनावट आणि खोटे दाखले देणाऱ्या पुण्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा ? – नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? महसूल विभाग स्वतःहून यामध्ये पुढाकार का घेत नाही ?

हिंदुहिताचे कायदे निर्माण होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – सतीश कल्याणकर, माजी सदस्य, सेन्सॉर बोर्ड

चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक हिंदूंना वाईट प्रवृत्तीचे दाखवण्यात येत असून अहिंदूंची प्रतिमा उंचावण्याचे षड्यंत्र सध्या चालू आहे.

सरकारी यंत्रणेतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून प्रतिवर्षी जनतेच्या कोट्यवधी रुपयांची लूट !

१२ वर्षांत १२ सहस्र ५९० (प्रत्येक दिवशी ३) लाचखोरीची प्रकरणे उघड !