(म्हणे) ‘भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेद्वारे काश्मीर प्रश्‍न सोडवावा !’ – चीन

भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये नाक खुपसण्याऐवजी चीनने त्याच्या देशात भेडसावणार्‍या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे ! भारतानेही आता चीनला शाब्दिक समज देण्यापेक्षा त्याला समजेल अशा भाषेत उत्तर देणे अपेक्षित आहे !

दोन्ही देशांत चर्चा होईपर्यंत चीनने त्याची गुप्तहेर नौका श्रीलंकेत पाठवू नये !

सध्या ही नौका तैवानजवळील समुद्रात आहे. या नौकेवर अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ही नौका श्रीलंकेत पोचली, तर ती तेथून भारतातील काही ठिकाणांची टेहाळणी करून संवेदनशील माहिती गोळा करू शकते.

पूर्व आशियातील युक्रेन म्हणजेच तैवान आणि चीन-अमेरिका यांच्यातील वाढता संघर्ष

अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून अमेरिका आणि चीन या देशांमधील वातावरण तापले होते. चीनच्या धमक्यांमुळे हा दौरा रहित केला जाईल, अशी अटकळ होती; पण हा दौरा पूर्णपणे पार पडला आहे. या पार्श्वभूमीवर ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

चीनने लडाख सीमेपासून त्यांची लढाऊ विमाने दूर ठेवावीत ! – भारताची चीनला चेतावणी

चीन अशा चेतावण्या गांभीर्याने घेण्याची शक्यता अल्प असल्याने भारतानेही स्वतःची लढाऊ विमाने चीनच्या सीमेजवळ उडवावीत आणि ‘जशास तसे’ प्रत्युत्तर द्यावे !

चीनने नॅन्सी पेलोसी यांना टाकले काळ्या सूचित

अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यानंतर चिडलेल्या चीनने पेलोसी यांना काळ्या सूचित टाकले. त्यांच्यावर अनेक निर्बंधही लादले आहेत.

भारताच्या आक्षेपानंतरही चीनची गुप्तहेर नौका ११ ऑगस्टला श्रीलंकेत पोचणार !

जोपर्यंत भारत चीनला धडा शिकवणार नाही, तोपर्यंत चीन अशीच दादागिरी करत राहील, हे लक्षात घेऊन सरकारने आता तरी चीनला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !

आम्हीही युद्धासाठी सिद्ध ! – तैवान

बलाढ्य चीनला रोखठोक उत्तर देणार्‍या छोटे बेट असणार्‍या तैवानकडून भारताने शिकले पाहिजे !

तैवान निमित्तमात्र !

आंतरराष्ट्रीय राजकारणात उक्तीपेक्षा कृतीला अधिक महत्त्व असते, हे अमेरिकेच्या तैवानविषयीच्या भूमिकेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. चीनने भारताचा बळकावलेला भूभाग परत मिळवण्यासाठी भारतानेही अशीच धडक कृती करणे आवश्यक !

तैवानशी असलेल्या मैत्रीचा आम्हाला अभिमान ! – अमेरिका

तैवानवरून अमेरिका-चीन यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता ! या संधीचा लाभ घेऊन भारताने चीनला कूटनीतिक, तसेच भूराजकीय स्तरावर नामोहरम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला वाटते !

चीनला अंधारात ठेवत अमेरिकेच्या विदेशमंत्र्यांचा तैवान दौरा !

तैवान हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचे चीन म्हणत आला असला, तरी तैवान हा स्वायत्त देश असून त्याची स्वत:ची शासनयंत्रणा आहे. आता अमेरिकेने केलेल्या खेळीमुळे चीन संतापला आहे.