चीनने नॅन्सी पेलोसी यांना टाकले काळ्या सूचित

अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी

बीजिंग (चीन) – अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यानंतर चिडलेल्या चीनने पेलोसी यांना काळ्या सूचित टाकले. त्यांच्यावर अनेक निर्बंधही लादले आहेत. सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने ‘अमेरिका तैवानच्या माध्यमातून चीनवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे’, असा आरोप अमेरिकेवर केला. चीन आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव, हा जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम करणारा ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.

यावर नॅन्सी पेलोसी म्हणाल्या, ‘‘मी लोकशाही आणि मानवाधिकार यांच्या रक्षणासाठी काम करत राहीन. अमेरिका तैवानच्या जनतेसमवेत उभी आहे.’’ तैवानच्या विरोधातही चीन आक्रमक झाला असून त्याने तैवानच्या अनेक वस्तूंवरील आयात बंद केली आहे.