चीनला अंधारात ठेवत अमेरिकेच्या विदेशमंत्र्यांचा तैवान दौरा !

नॅन्सी पलोसी यांची तैवान भेट अमेरिका-चीन तणाव वाढवतेय !

तायपेय (तैवान) – अमेरिकेच्या विदेशमंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) नॅन्सी पलोसी या चीनच्या धमकीला धुडकावत २ ऑगस्टच्या रात्री तैवानला पोचल्या. त्याआधी चीनच्या म्हणण्यावरून पलोसी यांनी तैवानचा दौरा न करण्याचे घोषित केले होते; परंतु चीनला अंधारात ठेवत त्या तैवानची राजधानी तायपेयच्या विमानतळावर उतरल्याचे तैवानच्या प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले.

तैवान हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचे चीन म्हणत आला असला, तरी तैवान हा स्वायत्त देश असून त्याची स्वत:ची शासनयंत्रणा आहे. आता अमेरिकेने केलेल्या खेळीमुळे चीन संतापला आहे.