चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि युरोप यांना भारताची आवश्यकता !

चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि युरोप यांना आता भारताची आवश्यकता भासू लागली आहे; मात्र भारताला त्रास देण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देश यांनी आतापर्यंत किती प्रयत्न केले ?, हे भारतियांनी कधी विसरू नये !

अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग ! – खासदार जेफ मर्कले आणि बिल हागेर्टी

हिंद आणि प्रशांत महासागर यांच्या स्वातंत्र्यासाठी चीन संकट ठरू पहात आहे, अशा वेळी अमेरिकेला त्याच्या राजकीय सहकार्‍यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून उभे रहाण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे भारतासमवेत !

चीनने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे केले बंद !

पाकमधील चिनी दूतावासाने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणारा विभाग ‘तांत्रिक कारणां’मुळे बंद केला आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिकांना चीनचा व्हिसा मिळण्यास अडचण येऊ शकते. चीन सरकारने पाकमधील चिनी दूतावासातील हा विभाग बंद करण्यामागे काही कारणे सांगितलेली नाहीत.

अमेरिकेच्या हवाई सीमेत ‘एलियन्स’ येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही ! – अमेरिकेचे सैन्याधिकारी

नुकतेच अमेरिकेने त्याच्या सीमेत घुसलेल्या चीनच्या मोठ्या फुग्याला क्षेपणास्त्र डागून पाडले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांत ४ संशयास्पद वस्तूही पाडण्यात आल्या आहेत.

शाळिग्राम यात्रेमुळे चिनी ‘अजेंड्या’ला (षड्यंत्राला) धक्का !

चीन सदैव भारत आणि नेपाळ यांच्या संबंधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतो. नेपाळही चीनच्या प्रभावाखाली येऊन भारताला लांब ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो; परंतु शाळिग्राम यात्रेने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

आफ्रिका खंडातील १३ देशांमध्ये सैनिकी तळ बनवण्याचा चीनचा प्रयत्न !

आफ्रिका खंडातील देशांना कर्ज देऊन त्यांना आर्थिक गुलाम बनवण्याच्या सिद्धतेत असणार्‍या चीनने आता तेथे सैनिकी तळ स्थापन करण्याची सिद्धता केली आहे. यासाठी चीनने १३ देशांची निवड केली आहे.

भारत, चीन आणि इराण यांच्या अफगाणिस्तानमधील दूतावासांवर आक्रमण करणार  

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आली इस्लामिक स्टेट(खुरासान)ची धमकी !

चीनने १२ देशांत हेरगिरी केली !

चीनच्या वाढत्या कुरापती या जागतिक शांततेसाठी धोकादायक ठरल्या आहेत. हे लक्षात घेऊन भारताने अधिकाधिक युद्धसज्ज होणे आवश्यक आहे !

चिनी नौका जगातील ८० देशांच्या समुद्री सीमेत करतात अवैध मासेमारी !

चीनच्या या अवैध कृत्यांना उघडे पाडण्यासाठी आता भारताने जागतिक स्तरावर पुढाकार घेणे आवश्यक आहे !

केंद्रशासनाकडून २३० चिनी ॲप्सवर बंदी

यातील १३८ ॲप्स ही जुगाराच्या संदर्भातील आहेत, तर ९४ ॲप्स कर्ज उपलब्ध करण्याविषयीची आहेत. गृह मंत्रालयाने या संदर्भात आदेश दिला आहे.