रत्नागिरीत रोखपालनेच केली बँकेची फसवणूक  : दीड लाख रुपये चोरले

‘कुंपणच शेत खाते’ ही म्हण सार्थ ठरवणारे बँकेचे रोखपाल ! अशांना कायमचे कारागृहात ठेवले, तरच अशा समस्यांना थोडा तरी आळा बसेल !

देशातील ९५ सहस्र ९२९ घोटाळ्‍यांत ३२ सहस्र ९१ कोटींचा अपहार !

‘ऑनलाईन’ फसवणुकीसाठी पोलिसांत ‘सायबर क्राईम’ असा स्‍वतंत्र विभाग आहे; मात्र रिझर्व्‍ह बँकेत ‘ऑनलाईन’ फसवणुकीसाठी ‘सायबर क्राईम’ असे वर्गीकरणच नाही. वर्ष २०२२-२३ मध्‍ये आर्.बी.आय.अंतर्गत येत असलेल्‍या देशातील सर्व बँकांमध्‍ये एकूण ९५ सहस्र ९२९ घोटाळे झाले.

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना ‘ईडी’ची क्लीन चिट ?

अजित पवार यांचे ‘ईडी’च्या आरोपपत्रात नावच नाही ! पुढील सुनावणी १९ एप्रिलला !

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत : गुंतवणूकदार चिंतेत

वर्ष २००८ मधील आर्थिक मंदीनंतर सिलिकॉन व्हॅली ही अमेरिकेतील बुडालेली सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक आहे. सिलिकॉन बँकेची स्थापना वर्ष १९८३ मध्ये बिल बिगरस्टफ आणि रॉबर्ट मेडेरिस यांनी कॅलिफॉर्निया येथे केली.

देशात प्रतिदिन बँक घोटाळ्यांद्वारे होते १०० कोटी रुपयांची हानी !

देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा झाल्याविना घोटाळ्यांच्या घटना थांबणार नाहीत !

पुणे येथील ‘रूपी बँक’ अपहार प्रकरणी १ सहस्र ४९० कोटी रुपयांचे दायित्व संचालकांवर !

‘रूपी बँके’तील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर प्रशासकाद्वारे बँकेचे कामकाज चालू होते. वर्ष २०१३ मध्ये निर्बंध घातले. तत्कालिन १५ संचालकांसह इतर अधिकारी मिळून ६९ जणांविरोधात चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले.

सहभागाची निश्चिती झाल्याविना संचालकांवर कारवाई करता येणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. या अधिकोषाचे अध्यक्ष सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असून त्यांची चौकशी चालू आहे.

नगर येथील ‘अर्बन’ अधिकोषातील अपव्यवहारावर कारवाई नाही ! – अधिकोषाचे सभासद

एवढा मोठा घोटाळा होऊनही या प्रकरणी संबंधित प्रशासकीय यंत्रणा झोपली आहे का ? प्रशासनाचे या घोटाळ्यातील संबंधितांशी लागेबांधे आहेत का ? हेसुद्धा पाहिले पाहिजे.

संभाजीनगर येथे लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास अटक !

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे पीक कर्ज घेतल्याचा घोटाळा वर्ष २०२१ मध्ये झाला होता. यात बँकेच्या वतीने मुख्य ७१ शेतकऱ्यांना आरोपी करत बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता.

वर्षभरात विविध बॅँकांमध्ये ६० सहस्र ५३० कोटींहून अधिक रुपयांचे घोटाळे !

अशा घोटाळ्यांमध्ये सर्वसामान्य ठेवीदारांचा पैसा भरडला जातो. यासह बँकांनी दिलेल्या अनेक कर्जांच्या रकमेची वसुली होत नसल्याने अशी कर्जे बडीत खात्यात वर्ग केली जातात.