प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालावी !

प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्याविषयी येथील नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे, तसेच पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये यासाठी लातूर येथील ‘वीर योद्धा संघटने’कडून जनजागृती आणि निवेदन !

‘वीर योद्धा संघटने’चे अभिनंदन ! संघटनेने व्यापार्‍यांचे प्रबोधन केले आणि व्यापार्‍यांनीही यापुढे देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री न करण्याचे मान्य केले.

मशिदींवरील भोंग्यांवर बंदीसाठी अली प्रयत्न कधी करणार ?

चित्रपट निर्मात्या रोशनी अली दिवाळी आणि अन्य वेळी फटाके फोडण्यावर बंगालमध्ये बंदी घालण्यासाठी पुन्हा कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहेत.

फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात पुन्हा याचिका प्रविष्ट करणार ! – चित्रपट निर्मात्या रोशनी अली

हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणाच्या नावाखाली न्यायालयात याचिका करणारे धर्मांध स्वधर्माच्या सणांच्या वेळी होणार्‍या प्रदूषणाच्या वेळी गप्प का बसतात ?

फटाक्यांमुळे होणारी शारीरिक हानी !

दिवाळीत फटाक्यांमुळे प्रतिवर्षी भारतात ६ सहस्र व्यक्ती दृष्टीहीन होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. बाधित व्यक्तींपैकी ६० टक्के व्यक्ती २० वर्षांखालील असतात. जगात प्रतिवर्षी फटाके आणि शोभेची दारू यांमुळे ५ लाख लोक अंध होतात.

फटाके वाजवल्यामुळे होणारे आध्यात्मिक स्तरावरील दुष्परिणाम जाणा !

‘भजन, आरती किंवा सात्त्विक नाद यांमुळे चांगल्या शक्ती किंवा देवता येतात, तर फटाके आणि तामसिक आधुनिक संगीत यांमुळे वाईट शक्ती आकर्षिल्या जातात. वाईट शक्तींमधील तमोगुणाचा परिणाम मानवावर होतो आणि त्याची वृत्तीही तामसिक होते.

धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत प्रशासनाला देण्यात आले.

वेलतूर (नागपूर) येथे पोलिसांनी देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री केली जाणारी ३ दुकाने बंद केली !

राष्ट्रीय वारकरी परिषदेने दिलेल्या निवेदनाचा परिणाम !

फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

कोलकाता उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने रहित केली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, ‘देशात फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही; परंतु त्यांचा अपवापर रोखण्यासाठीची यंत्रणा अधिक भक्कम करावी लागेल.’

सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी कायम ठेवावी !

यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी, यासाठी भारत सरकारने जागृती करावी. अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्यांची विक्री होऊ नये, याची दक्षता घ्यावी. अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.