कोरड्या खोकल्यावर घरगुती उपचार !
एक वाटी कोणत्याही खाद्यतेलामध्ये पाव चमचा ओवा आणि चिमूटभर हळद घालून हेे तेल एकदा गरम करावे. थंड झाल्यावर हे तेल गाळून बाटलीत भरून ठेवावे. कोरडा खोकला येत असेल, तेव्हा १ चमचा तेल प्यावे.
एक वाटी कोणत्याही खाद्यतेलामध्ये पाव चमचा ओवा आणि चिमूटभर हळद घालून हेे तेल एकदा गरम करावे. थंड झाल्यावर हे तेल गाळून बाटलीत भरून ठेवावे. कोरडा खोकला येत असेल, तेव्हा १ चमचा तेल प्यावे.
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘अॅलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
आपले आरोग्य ‘आपण आपला दिवस कसा घालवतो’ यावर अवलंबून असते. आयुष्यातील प्रत्येक दिवस निरोगी झाल्यास सर्व आयुष्यच आरोग्यसंपन्न आणि आनंदी होते. म्हणूनच आरोग्यरक्षण हा संयमी जीवनाचा पाया आहे !
एका नाकपुडीतून पाणी घालून दुसरीतून बाहेर काढणे याला ‘जलनेती’ म्हणतात. नेतीसाठी किंचित कोमट पाणी मीठ घालून वापरावे. नेतीचे एक विशिष्ट प्रकारचे भांडे (नेती पॉट) असते. त्यामुळे नाकपुडीत पाणी घालणे सोपे जाते. वाटी किंवा भांडे यांनीही नाकात पाणी घालू शकतो. आरंभी जलनेती करतांना थोडा त्रास होतो. नंतर सवयीने त्रास होत नाही.
पावसाळ्यात वाताचे जुने दुखणे हळूहळू डोके वर काढते. हवामानातील रुक्षता वाढल्याने वाताचे प्राबल्य वाढते. अशा परिस्थितीत शरिरामध्येही वातदोष वाढायला लागतो. पावसाळ्यात वातदोष आणि त्यामुळे निर्माण होणारे विविध रोग वाढू नयेत म्हणून आपण पुढील गोष्टी करू शकतो
योगसाधनेमुळे सकारात्मकता येऊन मनुष्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनही सुधारतो. ही व्यायामपद्धती संपूर्ण भारतीय आहे. आपल्या ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपासून ही पद्धत शोधून काढली आणि स्वीकारली होती. त्यामुळे ते दीर्घकाळ स्वस्थ आणि निरोगी जीवन जगू शकत होते.
जळूच्या समोर अॅलोपॅथी, होमियोपॅथी आणि आयुर्वेदीय औषधांच्या गोळ्या ठेवल्यावर तिने दिलेला प्रतिसाद आणि तिच्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.
अश्वगंधाच्या रेणूमुळे ८७ टक्क्यांहून अधिक कोरोना विषाणू नष्ट करण्यास साहाय्य झाल्याचे संशोधनातून लक्षात आले. मानवी पेशींवरही या रेणूंची चाचणी यशस्वी झाली आहे.
नियमबद्ध रहाणे आणि धर्माचरण करणे, हेच आरोग्यमय अन् यशस्वी जीवन जगण्याचे उपाय आहेत; कारण नियमबद्ध राहिल्याने आपले शरीर निरोगी रहाते आणि धर्माचरण केल्याने आपल्या मनाचे आरोग्य चांगले रहाते.
शरिराच्या संरचनेत पालट झाल्यास त्याचा कटी (कंबर), गुडघा, टाच इत्यादी सांध्यांवर ताण येऊन त्यांचे दुखणे चालू होते. असे होऊ नये, यासाठी एकाच खांद्यावर वजन न घेता आलटून पालटून दोन्ही खांद्यावर थोडा थोडा वेळ वजन घ्यावे.’