पावसाळ्यामध्ये शरिरातील अग्नीचे, पचनशक्तीचे रक्षण होण्यासाठी मित जेवावे, तसेच अधूनमधून उपवास करावा !
‘सततच्या पावसामुळे शरिरातील अग्नी, पचनशक्ती मंद होतेे. अग्नी मंद झाल्याने सर्दी, खोकला, ताप यांसारखे विकार होतात. पावसाळ्यात अग्नी चांगला रहाण्यासाठी पोटभर जेवणे टाळावे.