एका नाकपुडीतून पाणी घालून दुसरीतून बाहेर काढणे याला ‘जलनेती’ म्हणतात. नेतीसाठी किंचित कोमट पाणी मीठ घालून वापरावे. नेतीचे एक विशिष्ट प्रकारचे भांडे (नेती पॉट) असते. त्यामुळे नाकपुडीत पाणी घालणे सोपे जाते. वाटी किंवा भांडे यांनीही नाकात पाणी घालू शकतो. आरंभी जलनेती करतांना थोडा त्रास होतो. नंतर सवयीने त्रास होत नाही.
कृती : नाकाची जी नाकपुडी त्या वेळी जास्त सक्रीय असते, त्याच्या विपरीत दिशेला डोक्याला वाकवून नाकात पाणी घालू शकतो. ही क्रिया करतांना पायांमध्ये दीड ते दोन फुटांचे अंतर घेऊन, कमरेत थोडेसे वाकून तोंड उघडे ठेवायचे. या दरम्यान तोंड उघडे ठेवा आणि दीर्घ श्वास घेऊ नका. हे पाणी नाकाच्या दुसर्या नाकपुडीतून निघायला पाहिजे. हीच प्रक्रिया नाकाच्या दुसर्या नाकपुडीनेही करा. नेती केल्यावर दोन्ही नाकपूड्यांतून कपालभांती करून राहिलेले पाण्याचे थेंब बाहेर काढून टाकायचे. त्यामुळे सर्दी होणार नाही.
लाभ : दमा, न्यूमोनिया (फुफ्फुसाचा दाह), ब्राँकायटिस आणि फुफ्फुसीय क्षयरोग यांसारख्या श्वसन रोगांमध्ये उपयुक्त. मनाची स्थिती चांगली होण्यासाठीही उपयुक्त आहे. यामुळे ताण न्यून होतो. मानसिक आजारांवर उपयुक्त आहे. बुद्धीची स्थिती सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे तणाव न्यून होऊ शकतो. एकाग्रता वाढते. दृष्टी सुधारते, डोळे दुखणे, डोळ्यांवर ताण येणे, डोळ्यांत खाज येणे, डोळ्यांची जळजळ यावर उपयुक्त. ओलावा रहाणे यासाठी साहाय्य होते. घोरणे अल्प होऊ शकते. कोविडची लक्षणे दूर करण्यास अत्यंत उपयुक्त. मानेच्या वरच्या अवयवांच्या आरोग्यासाठी उत्तम. सर्दी, पडसे यांवर उपयुक्त फुफ्फुस, थायरॉईड यांच्या रोगांवर उपयुक्त. गळ्याच्या संसर्गातही जलनेती फायदेशीर आहे. डोकेदुखीची समस्या असल्यास कफ साफ होऊन हलके वाटते. जलनेती केल्याने प्राणायामाची सिद्धी होण्यास साहाय्य होते. अॅलर्जी, खोकला, दमा यांत उपयुक्त. नाक, कान, घसा, डोळे यांच्या त्रासावर उपयुक्त. ऋतू पालटल्यावर होणारी सर्दी, शिंका, घसा बसणे आदींवर उपयुक्त.