कोरड्या खोकल्‍यावर घरगुती उपचार !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १९९

वैद्य मेघराज पराडकर

‘एक वाटी कोणत्‍याही खाद्यतेलामध्‍ये पाव चमचा ओवा आणि चिमूटभर हळद घालून हेे तेल एकदा गरम करावे. थंड झाल्‍यावर हे तेल गाळून बाटलीत भरून ठेवावे. कोरडा खोकला येत असेल, तेव्‍हा १ चमचा तेल प्‍यावे. आवश्‍यकता वाटल्‍यास नंतर २ घोट कोमट पाणी प्‍यावे. तेल प्‍यायल्‍यावर लगेच खोकला थांबतो. खोकला न थांबल्‍यास पुन्‍हा अर्ध्‍या घंट्याने १ चमचा तेल प्‍यावे.

हा उपाय खोकला थांबेपर्यंत दिवसातून ३ – ४ वेळा करावा. (दिवसभरात ३ – ४ चमचे तेल प्‍यावे.) मापासाठी चहाचा चमचा वापरावा. ताप असतांना हा उपाय करू नये.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.५.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan