हिंदु महासभेचे राष्ट्रीय महामंत्री देवेंद्र पांडे यांच्यावर प्राणघातक आक्रमण

आरोपींना त्वरित अटक करण्याची अखिल भारतीय हिंदु महासभेची मागणी – भाजपच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण होणे अपेक्षित नाही ! तेथील हिंदुत्वनिष्ठांना आश्‍वस्त करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

धर्मांधांची धर्मनिरपेक्षता जाणा !

रायबरेली (उत्तरप्रदेश) येथे स्वच्छेने हिंदु धर्म स्वीकारून स्वतःच्या भूमीवर मंदिर बांधण्याचा प्रयत्न केल्यावर धर्मांध सरपंचाने साथीदारांसह देवप्रकाश पटेल यांच्या घराच्या दाराला बाहेरून कडी लावली. नंतर घराला आग लावून त्यांच्या कुटुंबाला जाळण्याचा प्रयत्न केला.

आंध्रप्रदेशात आता सीतामातेच्या मूर्तीची तोडफोड !

प्रतिदिन राज्यात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होऊन मूर्तींची तोडफोड होत असतांना ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी शांत कसे राहू शकतात ? अशी घटना अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांविषयी झाली असती, तर त्यांनी आकाशपाताळ एक केले असते !

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने औरंगाबादचे नामकरण करायला माझे समर्थन आहे ! – खासदार संभाजीराजे छत्रपती  

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने औरंगाबादचे नामकरण होत असेल, तर त्याचे स्वागत करायला पाहिजे. औरंगाबादचे नाव पालटण्यासाठी माझे समर्थन आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

अहमदनगरचे अंबिकानगर नामांतर करा ! – सदाशिव लोखंडे, खासदार, शिवसेना

औरंगाबादच्या नामांतराचा जुना वाद पुढे आल्यानंतर आता शिर्डी येथील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्यात यावे, अशी मागणी ३ जानेवारी या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली.

(म्हणे) ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या चर्चच्या भूमीत झालेल्या धार्मिक विधीचा निषेध ! – एलिना साल्ढाणा, भाजपच्या स्थानिक आमदार

ती भूमी कोणाचीही वैयक्तिक नाही, तर सरकारची आहे ! असे असतांना हिंदूंना तेथे जाण्यापासून कोणत्या आधारावर रोखले जात आहे ?

आंध्र नव्हे, ख्रिस्तीप्रदेश !

भाजपने जगनमोहन सरकारला पाठिंबा दिला आहे. केंद्रातील भाजप सरकारनेही या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यातून हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होईल, अशी अपेक्षा करू शकतो. अन्यथा उद्या आंध्रप्रदेश ‘ख्रिस्तीप्रदेश’ म्हणून ओळखला जाऊ लागला, तर आश्‍चर्य नव्हे !

पाकमधील हिंदु मंदिराच्या तोडफोडीच्या प्रकरणी ३० धर्मांधांना अटक

घटनेच्या ३ दिवसानंतर केंद्र सरकारने विरोध नोंदवणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने ‘पाकच्या अंतर्गत प्रश्‍नांत हस्तक्षेप नको’, असाही विचार केला असेल; मात्र हा अंतर्गत प्रश्‍न नाही, तर हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे !

उद्ध्वस्त मंदिराच्या निमित्ताने… !

गेली ७ दशके पाकमधील मंदिरांना अशा प्रकारे उद्ध्वस्त केले जाणे, ही धर्माभिमानी हिंदूंना नेहमीच अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. पाकमधील हिंदूंचा हा भयपट संपून त्यांचे निर्भय जीवन जगणे कधी चालू होणार आहे ?

पाकमध्ये शेकडो धर्मांधांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त करून जाळले !  

हिंदूंनो, पाकमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होण्यासाठी भारतासह जगातील एकही देश पुढे येत नाही, हे लक्षात घ्या ! पाकच नव्हे, तर जगभरातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक !