मिर्झापूर (उत्तरप्रदेश) – राजेश दुबे नावाच्या एका हिंदूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्याने अमजद नावाच्या चालकाने दुबे यांना गाडीखाली चिरडून त्यांची हत्या केली.
राजेश दुबे मिर्झापूर येथे त्यांच्या पुतणीच्या विवाहासाठी अमजदच्या गाडीतून जात होते. गाडीत अन्यही काही लोक होते. तेव्हा त्यांच्यात राजकारणावरून वाद झाला. दुबे यांनी पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. अमजदला हे आवडले नाही. त्यामुळे त्याने त्यांच्यावर टीका करण्यास आरंभ केला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष झाला.
PM मोदी और CM योगी को गाली दे रहा था अमजद, राजेश दुबे ने रोका तो बोलेरो से कुचलकर मार डाला: UP के मिर्जापुर की घटना, बारात से लौट रहे थे मृतक#UttarPradesh https://t.co/Xth5InYFGU
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 12, 2023
थोड्या वेळात अन्य लोक गाडीतून उतरले आणि दुबे हे अमजदच्या गाडीत एकटेच राहिले. दुबे त्यांच्या नियोजित स्थळी उतरून चालू लागल्यावर अमजदने त्यांच्या अंगावर गाडी चढवली. यात दुबे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १२ जूनच्या सायंकाळी मिर्झापूर-प्रयागराज महामार्गावर घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून घटनेचे अन्वेषण चालू केले आहे.
संपादकीय भूमिका
|

जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court