पुणे येथील सेवा विकास को-ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक 

पिंपरी-चिंचवडमधील सेवा विकास को-ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना अधिकोषातील २३८ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ७ मार्चला रात्री अटक केली.

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेसाठी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांचे आंदोलन

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी संशयित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात यावी, यासाठी १० मार्च या दिवशी विधीमंडळाच्या इमारतीच्या पायर्‍यांवर विरोधकांनी आंदोलन केले. भाजप आणि मित्र पक्षांच्या आमदारांनी फलक दाखवून शासनाचा निषेध केला. घोषणा देऊन सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली.

आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करणार्‍या श्रमजीवी संघटनेच्या ७० कार्यकर्त्यांना अटक

आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाच्या बाहेर ९ मार्च या दिवशी सकाळी आंदोलन करणार्‍या श्रमजीवी संघटनेच्या ७० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

भैसा (तेलंगाणा) येथे धर्मांधांकडून क्षुल्लक कारणावरून दंगल

तेलंगाणामध्ये तेलंगाणा राष्ट्र समितीच्या मुसलमानप्रेमी सरकारच्या राज्यात धर्मांधांचा उद्दामपणा असाच चालू रहाणार यात शंका नाही. बहुसंख्य हिंदूंच्या देशात आणि राज्यांत हिंदूंना अशा प्रकारे मार खावा लागतो, हे त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील अपव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना ‘ईडी’कडून अटक !

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील अनुमाने ७१ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना येरवडा कारागृहातून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे.

फातोर्डा पोलिसांनी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा २४ घंट्यांच्या आत लावला छडा

पोलिसांनी या प्रकरणी दादर, मुंबई येथील शिवाजी पार्क येथून रवीनकुमार सडा (वय १८ वर्षे, रहाणारा बिहार), आदित्यकुमार खरवाल (वय १८ वर्षे, रहाणारा झारखंड) आणि आकाश घोष (वय २० वर्षे, रहाणारा झारखंड) यांना कह्यात घेतले आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या ६ मासांत २३७ गुन्हेगारांना अटक

गुन्हेगारांवर कडक कारवाई करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्याचा विसर पोलिसांना अन्य वेळी पडलेला असतो का, असा प्रश्‍न सामान्यांच्या मनात आल्यास चूक ते काय ?

२० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना साहाय्यक फौजदारास रंगेहात पकडले

फौजदारच लाच घेत असतील, तर महाराष्ट्रातील भ्रष्टाचार कधीतरी अल्प होईल का ?

पुण्यातील गुंडांच्या टोळ्यांवर पोलिसांची कारवाई !

पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

पुणे कॉसमॉस बँक सायबर आक्रमणातील आरोपी सुमेर शेख याला दुबईमध्ये अटक !

सायबर गुन्हेगारांनी डार्क वेबवरून कॉसमॉस बँकेच्या ग्राहकांची गोपनीय इलेक्ट्रॉनिक माहिती चोरली होती. या माहितीचा वापर करून खोटे ए.टी.एम्. कार्ड बनवले.