युक्रेनकडून रशियाला बैठकीसाठी पाचारण

दोन्ही देशांमधील तणाव अल्प करण्यासाठी रशियाने बैठकीला उपस्थित रहाणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये कधीही थेट युद्ध प्रारंभ होऊ शकते ! – जो बायडेन

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये कधीही थेट युद्ध प्रारंभ होऊ शकते, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे.

गुजरातमधील हरामी नाल्यामध्ये पकडण्यात आल्या पाकच्या २ नौका !

भारत आणि पाक यांच्या सीमेवरील २२ किमी लांबीच्या खाडीला ‘हरामी नाला’ म्हणतात. 

भारतासारख्या शक्तीशाली राष्ट्राचा मुकुट असलेला जम्मू-काश्मीर कधीपर्यंत जिहादी कारवायांमध्ये जळत रहाणार ?

आक्रमणांच्या व्यतिरिक्त जवळ जवळ प्रतिदिन या क्षेत्रांमध्ये होणार्‍या अन्य आतंकवादी कारवाया, सीमेवर प्रतिवर्षी शेकडो वेळा होणारे युद्धविरामाचे उल्लंघन आणि आतंकवाद्यांची घुसखोरी सुद्धा आम्हाला लज्जास्पद ठरत आली आहे.

बर्फामध्ये अडकलेल्या ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’च्या सैनिकांना वाचवतांना सुभेदार मेजर पांडुरंग उदगुडे यांना आलेले अनुभव !

या लेखावरून अतीथंड कारगिलमध्ये सैनिकाची तैनात होणे, हे किती कठीण असते, याची आपल्याला कल्पना येईल. हे अनुभव सुभेदार मेजर पांडुरंग उदगुडे यांच्या शब्दांमध्ये पहाणार आहोत.

काश्मीर सीमेवरून भारतात घुसखोरी करणारे ३ पाकिस्तानी तस्कर ठार !

पाकमधील अमली पदार्थांची भारतात तस्करी करू पहाणार्‍या घुसखोरांचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेजवळ हाणून पाडला.

(म्हणे) ‘आम्हाला दोन्ही बाजूंकडील लोकांच्या सुरक्षेची काळजी असल्याने युद्धविराम !’ – पाक

पाकला दोन्ही बाजूंकडील लोकांच्या काळजीची जाणीव ७४ वर्षांनंतरच कशी झाली ? इतकी वर्षे पाक सीमेवर गोळीबार करून सामान्य भारतियांना लक्ष्य करत होता, त्या वेळी त्याच्या हे लक्षात येत नव्हते का ? पाक जगाला मुर्ख समजतो का ?

अमेरिकेच्या कारवाईत इस्लामिक स्टेटचा प्रमुख नेता अल्-हाशिमी अल्-कुरेशी ठार

भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या जिहादी आतंकवादी संघटनांच्या प्रमुखांना भारत पाकमध्ये घुसून का ठार करत नाही ?, असा प्रश्‍न अशा घटनांवरून जनतेच्या मनात येतो, याचा सरकारने विचार केला पाहिजे !

शत्रू राष्ट्रांशी भविष्यात काय संघर्ष होऊ शकेल, याची चुणूक आम्हाला सध्या दिसत आहे ! – सैन्यदलप्रमुख नरवणे

केवळ आघाडीवरूनच नव्हे, तर विविध माहितीस्रोत, सायबर विश्‍व, वादग्रस्त सीमा येथे या घडामोडी घडत आहेत, असे विधान भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी केले आहे

भारतात सामरिक संस्कृतीचा अभाव आहे का ?

‘समर विजयानंतर सत्तांतर होते तरी, नाहीतर ते टळते तरी. सामरिक विजय हा राष्ट्राचा असतो. प्रत्यक्ष युद्ध जरी सेना करत असेल, तरी विजयामध्ये वाटा सर्व समाजधुरिणांचा असतो. जिथे समाज विभागलेला असतो, तिथे अशी स्थिती नसते.