१८० कोटी रुपयांचे ३६ किलो हेरॉईन जप्त !

श्रीनगर – पाकमधील अमली पदार्थांची भारतात तस्करी करू पहाणार्या घुसखोरांचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेजवळ हाणून पाडला. येथील सांबा सेक्टरमध्ये ५ फेब्रुवारीच्या रात्री पाकचे ३ घुसखोर भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असतांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी त्यांना ठार केले. यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात येत आहे. त्यांच्याकडून ३६ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. या हेरॉईनची किंमत १८० कोटी रुपये आहे. जानेवारी मासामध्ये सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये ११ चकमकी झाल्या आहेत. यांमध्ये २१ आंतकवादी ठार झाले आहेत. गेल्या २ मासांत जम्मू-काश्मीरमध्ये ९ पाकिस्तानी आतंकवादी मारले गेले आहेत.
#BSF killed three #Pakistani smugglers at J&K’s #Samba sector.#JammuAndKashmir | @sunilJbhathttps://t.co/REP268A0BJ
— IndiaToday (@IndiaToday) February 6, 2022
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप