स्थिती भक्कम असल्यानेच युद्धविराम करण्यात आल्याचा भारताच्या सैन्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचा पाक सैन्याचा आरोप
पाकला दोन्ही बाजूंकडील लोकांच्या काळजीची जाणीव ७४ वर्षांनंतरच कशी झाली ? इतकी वर्षे पाक सीमेवर गोळीबार करून सामान्य भारतियांना लक्ष्य करत होता, त्या वेळी त्याच्या हे लक्षात येत नव्हते का ? पाक जगाला मुर्ख समजतो का ? – संपादक
इस्लामाबाद (पाकिस्तान) – नियंत्रण रेषेवर युद्धविरामाच्या स्थितीविषयी भारतीय सैन्याचा स्वतः भक्कम स्थितीत असल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. पाकिस्तानला नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंना रहाणार्या लोकांच्या सुरक्षेची काळजी असल्याने युद्धविराम मान्य करण्यात आला, असे पाकच्या सैन्याकडून भारतीय सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या विधानावर केला आहे. ‘कोणत्याही पक्षाने त्याच्या शक्तीचा आणि दुसर्याच्या दुर्बलतेचा चुकीचा अर्थ लावू नये’, असेही पाक सैन्याने म्हटले आहे. ‘नियंत्रण रेषेवर युद्धविराम चालू आहे; कारण भारताने स्वतःची भक्कम स्थिती कायम केली आहे’, असे जनरल नरवणे यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते. फेब्रुवारी २०२१ पासून भारत आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये नियंत्रण रेषेवर युद्धविराम आहे.
भारतीय सेना प्रमुख #GeneralNarvane की किस बात से #Pakistan को लगी ‘मिर्ची’? बयान जारी कर करने लगा ताकत और कमजोरी की बात
सब्सक्राइब करें #TimesNowNavbharat 👉https://t.co/ogFsKf9YX1#IndianArmy #ImranKhan #TimesNowNavbharatOriginals #GeneralMMNarvane pic.twitter.com/bbXqTgdClE
— Times Now Navbharat (@TNNavbharat) February 5, 2022