आतंकवाद्यांशी लढतांना २ गोळ्‍या लागूूनही मागे न हटणारा भारतीय सैन्‍याचा ‘झूम’ नावाचा श्‍वान !

घायाळ झालेल्‍या झूमवर सैन्‍य रुग्‍णालयात उपचार चालू

सीमा सुरक्षा दलाच्‍या कारवाईत एक बांगलादेशी गोतस्‍कर ठार

सैनिकांनी ८ ऑक्‍टोबरच्‍या रात्री १५ ते २० बांगलादेशी गोतस्‍करांच्‍या एका टोळीला गुरांसमवेत सीमेजवळ थांबवले असता टोळीने सैनिकांना घेरले आणि धारदार शस्‍त्रे अन् लाठ्या यांद्वारे आक्रमण केले.

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे २ आतंकवादी ठार

आतंकवाद्यांची निर्मिती करणार्‍या पाकला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत देशाला आतंकवादाची समस्या ग्रासत राहील ! यासाठी पाकलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !

बालाकोट हवाई आक्रमणाच्या (‘एअर स्ट्राईक’च्या) आखणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे दुसरे संरक्षणप्रमुख (निवृत्त) लेफ्टनंट जनरल अनिल चौहान !

(निवृत्त) लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी प्रदीर्घ काळ सैन्यदलाच्या पूर्व विभागाचे उत्तरदायित्व सांभाळले होते. चीनविरुद्ध सामरिक रणनीती आखणारे तज्ञ म्हणून ते ओळखले जातात.

रशियाला क्रिमियाशी जोडणार्‍या कर्च स्ट्रेट पुलावर भीषण स्फोट

ही दुर्घटना होती कि युक्रेनने केलेले आक्रमण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून एका वैमानिकाचा मृत्यू !

तवांग येथे भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर ‘चित्ता’ कोसळल्याने झालेल्या अपघातात लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव या वैमानिकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक वैमानिक घायाळ झाला.

जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार

अशा असंख्य चकमकी करूनही जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही. यासाठी त्याची शिकवण देणारे, तसेच आतंकवादाचा निर्माता पाकला नष्ट करणे, हाच मूलगामी उपाय आहे, हे भारतीय शासनकर्ते केव्हा लक्षात घेणार ?

निवृत्त लेफ्टिनंट जनरल अनिल चौहान नवीन सी.डी.एस्. !

उत्तराखंडचे असलेले चौहान ‘गोरखा रायफल’मध्ये अधिकारी होते. चौहान हे सी.डी.एस्. समवेतच सैन्याच्या विविध विभागांचे सचिव म्हणूनही काम करणार आहेत.

पाकिस्तानमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून ६ सैन्याधिकारी ठार

‘द बलुचिस्तान पोस्ट’ या दैनिकाने ट्वीट करत ‘या अपघातामागे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांचा हात आहेत’, असा दावा केला आहे.

आसाममधील भारत-बांगलादेश सीमेवरून १० लाख रुपयांच्या मादक पदार्थांच्या गोळ्या जप्त

आसाम रायफल्स आणि सीमा सुरक्षा दल यांनी संयुक्तरित्या ही कारवाईत केली.