आसाममधील भारत-बांगलादेश सीमेवरून १० लाख रुपयांच्या मादक पदार्थांच्या गोळ्या जप्त

करीमगंज (आसाम) – येथे भारत-बांगलादेश सीमेवर लाफासेल गावात १० लाख रुपये किमतीच्या २ सहस्र ‘याबा’ गोळ्या जप्त केल्या. आसाम रायफल्स आणि सीमा सुरक्षा दल यांनी संयुक्तरित्या ही कारवाईत केली.

‘याबा’ गोळ्या या नशेसाठी वापरल्या जातात. त्या लाल आणि गुलाबी रंगांच्या असतात. या गोळ्यांमध्ये मेथॅम्फेटा माइन आणि कॅफिन यांचे मिश्रण असते. हे व्यक्तीच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करण्याचे काम करते. या गोळ्या म्यानमारमधून पाठवल्या जातात आणि बांगलादेश मार्गे भारतात येतात. याला ‘क्रेझी मेडिसिन’ असेही म्हणतात.