जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार

प्रातिनिधिक छायाचित्र

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राज्यातील शोपियां येथे भारतीय सैन्य आणि जिहादी आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. येथील द्राच क्षेत्रामध्ये ४ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या चकमकीत जैश-ए-महंमदच्या ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तर शोपियांच्याच मूलू क्षेत्रामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या एका आतंकवाद्याला ठार करण्यात आले.

द्राच क्षेत्रामध्ये मारले गेलेले २ आतंकवादी हनान बिन याकूब आणि जमशेद यांनी पुलवामाच्या पिंगलानामध्ये काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी जावेद डार यांची हत्या केली होती.

संपादकीय भूमिका

अशा असंख्य चकमकी करूनही जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही. यासाठी त्याची शिकवण देणारे, तसेच आतंकवादाचा निर्माता पाकला नष्ट करणे, हाच मूलगामी उपाय आहे, हे भारतीय शासनकर्ते केव्हा लक्षात घेणार ?