कोलकाता – बंगालच्या नदिया जिल्ह्यातील विष्णूपूर सीमा चौकी येथे सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी केलेल्या कारवाईत एक बांगलादेशी गोतस्कर ठार झाला. सैनिकांनी ८ ऑक्टोबरच्या रात्री १५ ते २० बांगलादेशी गोतस्करांच्या एका टोळीला गुरांसमवेत सीमेजवळ थांबवले असता टोळीने सैनिकांना घेरले आणि धारदार शस्त्रे अन् लाठ्या यांद्वारे आक्रमण केले. तस्करांना घाबरवण्यासाठी सैनिकांनी आधी हवेत गोळीबार केला; पण तस्करांनी आक्रमण करणे चालूच ठेवले. तेव्हा एका सैनिकाने आणखी एकदा गोळीबार केला. त्यात एक तस्कर गंभीर घायाळ झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तस्करांच्या टोळीतील इतर सदस्य संधी साधून बांगलादेशकडे पळून गेले.
सीमा सुरक्षा बल (BSF) ने एक एनकाउंटर में बांग्लादेशी स्मगलर को मार गिराया है. https://t.co/t4SqE9iM9h
— AajTak (@aajtak) October 9, 2022
आसाममध्ये अमली पदार्थांचा दलाल ठार
अन्य एका घटनेमध्ये आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यात पोलिसांनी अमली पदार्थांच्या एका दलालाच्या घरावर धाड टाकली. त्या वेळी दलालाच्या गटाने पोलीस पथकावर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनी एका ३६ वर्षीय संशयिताच्या पायावर गोळी मारली. अधिक रक्त वाहत असल्याने त्याला रुग्णालयात नेत असतांना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या इतर ३ साथीदारांना अटक करण्यात आली आहे.