हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या पत्नी श्रीमती कनिका राणे झाल्या लष्करात अधिकारी
देशासाठी सैन्यात भरती होण्याचा निश्चय करून ते ध्येय साध्य करणार्या श्रीमती रावराणे यांच्यासारख्या रणरागिणींची आज देशाला आवश्यकता आहे.
देशासाठी सैन्यात भरती होण्याचा निश्चय करून ते ध्येय साध्य करणार्या श्रीमती रावराणे यांच्यासारख्या रणरागिणींची आज देशाला आवश्यकता आहे.
‘भारतीय सैन्यदलातील ८६ टक्के सैन्यउपकरणे आणि शस्त्रास्त्रे ही रशियन बनावटीची आहेत, अशी माहिती अमेरिकेतील ‘स्टिम्सन सेंटर’च्या अहवालात देण्यात आली आहे.
शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने केलेल्या आक्रमणात राजौरी येथे करवीर तालुक्यातील निगवे-खालसा येथील हवालदार संग्राम पाटील (३७ वर्षे) हे २१ नोव्हेंबर या दिवशी हुतात्मा झाले आहेत. ते गेली १७ वर्षे मराठा बटालीयनमध्ये सेवा बजावत होते.
श्रीलंकेतील २ न्यायालयांनी लिट्टेच्या कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे. हे दोघे कार्यकर्ते श्रीलंकेच्या सैन्यासमवेत झालेल्या युद्धामध्ये ठार झाले होते.
पंजाब पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाच्या रवींद्र सिंह या सैनिकाला पाकसाठी शस्त्र आणि अमली पदार्थ यांची तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे.
आज १२ वर्षांनंतरही आतंकवादी पुन्हा असेच आक्रमण करण्याची सिद्धता करतात, हे पहाता भारताने गेल्या १२ वर्षांत देशातील जिहादी आतंकवाद नष्ट केलेला नाही, त्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करण्याचे धाडस भारताने आता दाखवायला हवे !
जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमध्ये अशा चकमकी होऊन आतंकवादी ठार होत रहाणार आणि नवीन आतंकवादी निर्माण होत रहाणार !
पाकमधून २५० ते ३०० जिहादी आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत.
नगरोटा (जम्मू-काश्मीर) येथे १९ नोव्हेंबरच्या पहाटे बान टोल नाक्यावर आलेल्या एका ट्रकमधून आतंकवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला. या वेळी ३ घंटे झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले.
आजच्या तरुणांनी केवळ सामाजिक माध्यमांद्वारे पोस्ट टाकण्याएवढेच सिमीत न रहाता प्रत्येक मंडळ, घरांमध्येही सैनिक हुतात्मा झालेल्याचा दुखवटा व्यक्त केला पाहिजे, असे मत दत्त मंदिर तमणाक वाडा येथील प.पू. सद्गुरु सच्चिदानंद महाराज यांनी व्यक्त केले.