हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या पत्नी श्रीमती कनिका राणे झाल्या लष्करात अधिकारी 

पती वियोगानंतर देशासाठी सैन्यात भरती झालेल्या लेफ्टनंट कनिका राणे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा !

सिंधुदुर्ग – मूळचे जिल्ह्यातील सडूरे, वैभववाडी येथील हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी श्रीमती कनिका या ‘लेफ्टनंट’ झाल्या आहेत. चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत (ओटीए) ९ मासांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी लेफ्टनंट पदाचे २ ‘स्टार’ मिळवले आहेत.

 मेजर रावराणे ऑगस्ट २०१८ मध्ये काश्मीरच्या गुरेझ भागात आतंकवाद्यांशी लढतांना हुतात्मा झाले होते. त्या वेळी त्यांचा मुलगा हा फक्त २ वर्षांचा होता. मेजर कौस्तुभ यांच्या पत्नी श्रीमती कनिका या मुंबईत नोकरी करत होत्या. पती हुतात्मा झाल्यानंतर मात्र श्रीमती कनिका यांनी स्वतःहून लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये यश मिळवल्याने त्यांची प्रशिक्षणासाठी मागील वर्षी निवड झाली होती. हे प्रशिक्षण पूर्ण करून त्या आता लष्करात अधिकारी झाल्या आहेत. एरव्ही मूल लहान असले की, त्यांची आई नोकरी सोडून घरी रहाणे पसंत करते; मात्र श्रीमती कनिका यांनी मुलगा लहान असतांनाही ९ मासांचे खडतर प्रशिक्षण चेन्नईत राहून पूर्ण केले, हे विशेष !

(लेफ्टनंट श्रीमती कनिका रावराणे यांचे अभिनंदन ! पती वियोगाचे दु:ख न करता त्याच वेळी देशासाठी सैन्यात भरती होण्याचा निश्‍चय करून ते ध्येय साध्य करणार्‍या श्रीमती राणे यांच्यासारख्या रणरागिणींची आज देशाला आवश्यकता आहे. यातून ‘लव्ह जिहाद’ला बळी पडून जीवन उद्ध्वस्त करणार्‍या, अंगप्रदर्शन करून स्वत:च्या देहाचा बाजार मांडणार्‍या काही चित्रतारकांना डोक्यावर घेणार्‍या महिला आणि युवती यांनी बोध घेतला पाहिजे ! – संपादक)