Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्‍या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू

पोलिसांनी केली अटक !

 

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे एका हिंदु मुलीची छेड काढणार्‍या शाहनवाज (वय ३० वर्षे) नावाच्या मुसलमानाला पीडित मुलीने विरोध केला. याचा प्रतिशोध घेण्यासाठी शाहनवाजने त्या मुलीला बलपूर्वक इमारतीच्या चौथ्या मजल्यावर नेऊन तेथे तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने त्यासही विरोध केल्याने त्याने तिला खाली फेकून दिले. यात त्या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शाहनवाजला अटक केली आहे.

१. मृत हिंदु मुलीचे नाव खुशी होते आणि तिचे वय अवघे १५ वर्षे होते.

२. खुशीची आई मंजू यांनी सांगितले की, १५ जुलैच्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी घरासमोरील दुकानात दूध आणण्यासाठी गेली होती. या वेळी शेजारी रहाणारा शाहनवाज तिथे आला. तो खुशीला बलपूर्वक जवळच असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे त्याने खुशीसमवेत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मुलीने याला तीव्र विरोध केला, तेव्हा संतापलेल्या शाहनवाजने तिला चौथ्या मजल्यावरून थेट खाली ढकलून दिले.

पीडितने भररस्त्यात आरोपीच्या कानाखाली मारली होती !

मृत खुशीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, शाहनवाज गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या मुलीचा सतत पाठलाग करत होता. तो येता-जाता खुशीला त्रास द्यायचा आणि तिची छेड काढण्याचा प्रयत्न करायचा. काही दिवसांपूर्वी याच कारणावरून दोघांमध्ये रस्त्यावर जोरदार वाद झाला होता. त्या वेळी खुशीने धाडस दाखवत शाहनवाजच्या कानाखाली लगावली होती. शाहनवाज हा अपमान सहन करू शकला नाही आणि तो खुशीचा प्रतिशोध घेण्याच्या शोधात होता. शेवटी संधी मिळताच त्याने हे भयंकर कृत्य करून खुशीचा जीव घेतला.

संपादकीय भूमिका

क्रूर आणि वासनांध धर्मांध ! हिंदूबहुल उत्तरप्रदेशात हिंदुत्ववादी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांनाही सरकारला मुसलमानांचा उद्दामपणा रोखता येत नाही, हे सरकारला लज्जास्पद ! उत्तरप्रदेशात हिंदूंची ही स्थिती असेल, तर अन्य राज्यांत कशी स्थिती असेल ?, याचा विचारच न केलेला बरा !