Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी

वक्फ बोर्डात मुसलमानेतर आणि शिया सदस्य यांचा समावेश न केल्याचे प्रकरण

थिरूवनंतपूरम् (केरळम्) – केरळ उच्च न्यायालयाने राज्य वक्फ बोर्डाला न्यायालयाच्या स्पष्ट अनुमतीविना कोणताही नीतीविषयक निर्णय घेण्यास किंवा भांडवली खर्च करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. जोपर्यंत ‘वक्फ कायदा, १९९५’च्या कलम १४ नुसार बोर्डाची पुनर्रचना केली जात नाही, तोपर्यंत हे निर्बंध लागू रहातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने म्हटले आहे की, सध्या अस्तित्वात असलेल्या बोर्डाची रचना वैधानिक आदेशांचे पालन करत नाही; कारण त्यामध्ये २ मुसलमानेतर सदस्य आणि शिया समुदायाचा एक प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आलेला नाही. अंतरिम व्यवस्था म्हणून बोर्डाने राज्य सरकारच्या वक्फ विभागाचे कामकाज पहाणार्‍या संयुक्त सचिवांच्या देखरेखीखाली काम करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.