आरक्षित तिकीट असतांनाही न्यायाधिशांना विमानात जागा न दिल्याचा परिणाम

नवी देहली – एका न्यायाधिशांनी तिकीट आरक्षित करूनही ‘विस्तारा एअरलाईन्स’ने त्यांना विमानात चढू न दिल्याच्या कारणावरून ग्राहक आयोगाने या एअरलाईन्सला १ लाख रुपयांचा दंड आणि कायदेशीर खर्चापोटी १० सहस्र रुपये देण्याचा आदेश दिला. तक्रारदार न्यायाधिशांचे नाव भूपेंद्र कुमार वासनीकर आहे. ते छत्तीसगडमधील जिल्हा न्यायालयात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.
वर्ष २०२३ मध्ये काश्मीरहून परततांना न्यायाधिशांच्या कुटुंबाने देहलीहून रायपूरला (छत्तीसगड) जाण्यासाठी ‘विस्तारा एअरलाईन्स’चे तिकीट आरक्षित केले होते; मात्र विमान उड्डाण होण्याआधी विमानातील जागा भरल्यामुळे न्यायाधिशांना विमानात बसण्यास मनाई करण्यात आली. आरक्षित तिकीट असूनही एअरलाईन्सने अपमानास्पदरित्या विमानात न घेतल्यामुळे संबंधित न्यायाधिशांनी ग्राहक आयोगाकडे धाव घेतली होती. एअरलाईन्सने त्यांचे ७ सहस्र रुपयांचे तिकीट परस्पर दुसर्या प्रवाशाला ४० सहस्र रुपयांना विकल्याचे उघड झाले होते.
अशाच प्रकारच्या तक्रारी असलेल्या ग्राहकांनी साहाय्यासाठी आपापल्या राज्यातील ‘ग्राहक हेल्पलाइन’वर संपर्क साधावा किंवा राष्ट्र्रीय ग्राहक हेल्पलाइन १९१५ वर संपर्क करावा, असे आवाहन ग्राहक आयोगाकडून करण्यात आले आहे.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’