इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारल्याचा दावा ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने (‘बीएल्ए’ने) केला. ‘बीएल्ए’चे प्रवक्ते जीयंद बलुच यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसारित करून ‘बीएल्ए’च्या ‘फतह स्क्वाड’ या विशेष पथकाच्या लढवय्यांनी मस्तुंग जिल्ह्यातील खडकोचा भागात हे आक्रमण केल्याचे सांगितले. ते पुढे की, आधी सैन्याच्या ताफ्यावर दबा धरून आक्रमण करण्यात आले आणि जेव्हा अतिरिक्त सैनिक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांच्यावरही आक्रमण करण्यात आले.
पाकिस्तानकडून दुजोरा नाही !
‘बीएल्ए’ने केलेल्या या दाव्याला पाकिस्तानचे सैन्य किंवा सरकार यांनी अद्याप अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !