
ढाका (बांगलादेश) – देशाचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी तिस्ता नदी प्रकल्पात भारताच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला नकार देत तो चीनकडे सोपवला. चीन अनुमाने ९ सहस्र कोटी रुपयांच्या ‘तिस्ता रिव्हर मॅनेजमेंट प्रोजेक्ट’मध्ये ७ सहस्र कोटी रुपये कर्ज म्हणून देणार आहे. बांगलादेशाला ते ५० वर्षांत फेडावे लागेल. भारताने चीनला दूर ठेवण्यासाठी वर्ष २०२४ मध्ये तत्कालीन शेख हसीना सरकारला ९ सहस्र कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला होता; पण शेख हसीना सरकार कोसळल्यामुळे यावर निर्णय होऊ शकला नाही.
सिलिगुडी कॉरिडॉरपासून अवघ्या २२ किलोमीटरवर असणार चीन
४१४ किलोमीटर लांब तिस्ता नदी हिमालयातून सिक्कीम, बंगालमार्गे बांगलादेशात येते. वर्ष २०११ मधील हंगामी पाणी करारात ३७.५ टक्के पाणी बांगलादेशाला मिळणार होते. बंगालने याला विरोध केला. त्यामुळे हा पाणी करार टळला होता. प्रकल्प क्षेत्र भारतीय सीमेपासून १० ते १२ कि.मी. आणि सिलिगुडी कॉरिडॉरपासून अर्थात् ‘चिकन नेक’पासून २२ कि.मी. अंतरावर आहे. (‘चिकन नेक’ म्हणजे बंगालमध्ये असणारा अनुमाने २२ किलोमीटर लांबीचा अत्यंत अरुंद भूभाग. ईशान्येकडील ७ राज्यांना उर्वरित भारताशी जोडणारा हा एकमेव भूमार्ग आहे. )
ज्या आस्थापनाकडून हे काम केले जाणार आहे ते ‘पॉवर चायना’ आस्थापन स्वतंत्र व्यावसायिक आस्थापन नाही, तर चिनी सैन्याशी खोलवर जोडलेले सरकारी आस्थापन आहे. शेकडो चिनी अभियंते, तंत्रज्ञ यांची भारताच्या ईशान्येतील संवेदनशील सीमेवर दीर्घकाळ उपस्थिती रहाणार आहे. हे भारतासाठी मोठे आव्हान असेल, अशी सुरक्षा तज्ञांची चिंता आहे.
चीन बांगलादेशाला लढाऊ विमान देण्यावर चर्चा
सूत्रांनुसार पंतप्रधान तारिक रहमान यांचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर जनरल शमशुल इस्लाम यांनी नुकतीच चीनच्या राजदूताची भेट घेतली होती. यात बांगलादेशाला चीनकडून लढाऊ विमान देण्यावर चर्चा झाली.
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !