AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !

विद्यार्थ्यांना ५०० रुपयांमध्ये विकायचा नशेची पुडी !

फरिदाबाद (हरियाणा) – येथील ‘अल-फलाह मेडिकल कॉलेज’चा ‘एम्.बी.बी.एस्.’चा विद्यार्थी अदीदशाह याला गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. गुन्हे शाखेच्या पथकाने अदीदशाहला २०० ग्रॅम गांजासह रंगेहात पकडले. आरोपी विद्यार्थी अदीदशाह हा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरचा रहिवासी आहे.

पोलिसांनी सांगितले की, अदीदशाह देहलीतून गांजा खरेदी करायचा आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना छोट्या-छोट्या पुड्या बनवून विकायचा. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

बरेच उच्चशिक्षित मुसलमान विद्यार्थी, खेळाडू, नोकरशहा आदी अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतल्याचे समोर येत आहे. या अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळणारा पैसा आतंकवाद्यांना तर पुरवला जात नाही ना ?, याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. पोलीस आणि प्रशासन अशांच्या कारवायांवर लक्ष ठेवतील का ?