Corona : आंध्रप्रदेशात २० दिवसांत आढळले कोरोनाचे १२ नवीन रुग्ण !

४ रुग्णांचा मृत्यू !

प्रतीकात्मक चित्र

कडप्पा (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशात २६ जून ते १६ जुलै या कालावधीत  कोरोनाचे १२ नवीन रुग्ण आढळले. यांपैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले सर्व रुग्ण आधीपासूनच इतर आजारांनी ग्रस्त होते. सर्वाधिक रुग्ण कडप्पा जिल्ह्यात आढळले आहेत. या जिल्ह्यातील ‘रिम्स’ रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी विलगीकरण कक्षदेखील सिद्ध करण्यात आला आहे. आरोग्य आयुक्तांनी सांगितले की, सर्व रुग्ण वेगवेगळ्या भागांतील असून संसर्गाचा एकच मोठा स्रोत नाही.