Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’

अभिनेते आमिर खान यांचे धादांत खोटे विधान !

मुंबई – सोनम वांगचूक यांच्यावर आधारित अभिनेते आमिर खान यांचा ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट पूर्वी प्रदर्शित झाला होता. सध्या सोनम वांगचूक हे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी त्यागपत्र द्यावे, यासाठी उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला २० दिवस झाल्यानंतर आमिर खान यांना त्याविषयी प्रश्न विचारल्यावर त्यांनी ‘या चित्रपटापूर्वी मी वांगचूक यांना  ओळखत नव्हतो’, असे धादांत खोटे विधान केले. या वेळी त्यांनी वांगचूक यांच्या कामाची प्रशंसाही केली.

‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी जिथे सोनम वांगचूक यांना त्यांच्या कामासाठी ‘रिअल हीरोज्’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तिथे खान हे पत्नीसह उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सोनम यांनी ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचे कौतुकही केले होते. त्याचप्रमाणे सोनम वांगचूक आमिरसमवेतच्या भेटीविषयी सांगतांनाचा एक व्हिडिओही उपलब्ध आहे.

संपादकीय भूमिका

अभिनेत्यांचे खरे स्वरूप असेच उघड होते ! यापूर्वीही आमिर खान यांची हा भारताचा शत्रू असलेल्या तुर्किये देशाच्या पंतप्रधानांसमवेत, तसेच भारताचे शत्रू असलेल्या अन्य आंतकवाद्यांसमवेत छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती, हे जनतेने विसरलेली नाही !