US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण

नियंत्रण मनोरा पाडला !

तेहरान (इराण) – अमेरिककडून सलग ६ व्या दिवशी इराणच्या सैन्यतळांवर आक्रमण करण्यात आले. या वेळी अमेरिकेने इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण केले. यात या बंदराची मोठी हानी झाल्याचे दिसून आले. बंदरातील सागरी नियंत्रण मनोर्‍याला लक्ष्य करण्यात आले. गेल्या एका आठवड्यात या मनोर्‍यावर झालेले अमेरिकेचे हे तिसरे आक्रमण आहे.

अमेरिकेने भूमीवरून आक्रमण केले, तर त्याच्या सैनिकांची हत्या करू ! – इराण

इराणी खासदार बेहनाम सईदी यांनी अमेरिकेला या आक्रमणांवरून धमकी देत म्हटले की, अमेरिकेने इराणवर भूमीवरून आक्रमण केले, तर अमेरिकी सैनिकांची हत्या केली जाईल.

हॉर्मुझमध्ये भारतीय खलाशांची नियुक्ती होणार नाही ! – भारत

भारत सरकारने हॉर्मुझ सामुद्रधुनीतून (दोन जलाशयांना जोडणार्‍या जलमार्गातून) जाणार्‍या नौकांवर भारतीय खलाशांची सध्या नियुक्ती थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.