कार्ला येथील श्री एकवीरादेवी मंदिर परिसराचा विकास लवकरच होईल ! – डॉ. नीलम गोर्‍हे

श्री एकवीरादेवी मंदिराच्या पायर्‍यांची दुरुस्ती, ‘रोप वे’, भक्त निवास यांसह इतर पायाभूत सुविधांसाठी ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’कडे (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) दायित्व सोपवले आहे.

वेरूळ लेणी (छत्रपती संभाजीनगर) येथील छतावरील नटराजाच्या मूर्तीला तडे गेले !

पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : अभ्यासकांच्या मते हा गंभीर प्रकार !

मध्यप्रदेशातील भोजशाळेत अज्ञातांनी ठेवली देवतेची प्राचीन मूर्ती !

भोजशाळा श्री सरस्वतीदेवीचे प्राचीन मंदिर असल्याने ते हिंदूंच्या कह्यात देणे आवश्यक असून तेथून मुसलमानांची मशीद हटवण्यासाठी केंद्र आणि राज्य येथील भाजप सरकारांनी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणी अभ्यास समितीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी अभ्यास करण्यासाठी सरकारने डॉ. वर्षा कामत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.

शंखवाळ येथे श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराचे अस्तित्व पडताळण्यासाठी भूमीचे उत्खनन करा !

शंखवाळ (सांकवाळ) येथे पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर वर्ष १५०६ मध्ये पोर्तुगिजांनी पाडले. सध्या तेथे मंदिराचे प्रवेशद्वार अस्तित्वात आहे आणि याला ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळ गावाचे प्रवेशद्वार) असे संबोधले जाते.

विशाळगडावरील अतिक्रमण तात्‍काळ जमीनदोस्‍त करा ! – नितीनराजे शिंदे, विशाळगडमुक्‍ती आंदोलन

गड-किल्‍ल्‍यांवर झालेल्‍या अतिक्रमणावर प्रशासन स्‍वतःहून कारवाई कधी करणार ?

शंखवाळ येथे श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर बांधा ! – स्थानिकांची मागणी

शंखवाळ (सांकवाळ) येथे ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळचे प्रवेशद्वार) या वारसा स्थळी श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली. या वेळी पूजण्यात आलेली मूर्ती ही देवीच्या भक्तांना चालू वर्षी मे मासात याच परिसरात नदीच्या काठी सापडली होती.

प्राचीन स्मारकांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरणार !

पुरातत्व विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील प्राचीन स्मारकांची दुरवस्था झाली आहे. भरती प्रक्रियेनंतरही यामध्ये सुधारणा होण्यासाठी राज्यशासनाने दक्ष रहाणे आवश्यक आहे !

ज्ञानवापीची एक इंच भूमीही आम्ही देणार नाही ! – पू. (अधिवक्ता) हरीशंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन

मी स्पष्ट सांगू इच्छितो की, सनातन धर्मियांच्या काशीमधील भोलेनाथाची एक इंच भूमीही आम्ही देणार नाही. मुसलमान समाज (हिंदूंची) क्षमा मागून अनधिकृत नियंत्रण हटवेल, असे मात्र होऊ शकते, असे सडेतोड वक्तव्य पू. (अधिवक्ता) हरीशंकर जैन यांनी ‘एक्स’द्वारे ट्वीट करून केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्याशी असलेल्या संबंधांची कागदपत्रे उजेडात आणणार ! – पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा

छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यासाठी त्यांनी केलेले कार्य या संदर्भातील कागदपत्रे, दस्तावेज पुराभिलेख खात्याकडे उपलब्ध आहेत. किल्ल्यांवर जाऊन ही माहिती गोळा करण्यात आली असून, ही माहिती उजेडात आणण्यात येणार आहे.