लोणावळा (जिल्हा पुणे) – श्री एकवीरादेवी मंदिराच्या पायर्यांची दुरुस्ती, ‘रोप वे’, भक्त निवास यांसह इतर पायाभूत सुविधांसाठी ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’कडे (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) दायित्व सोपवले आहे. यामुळे परिसरामध्ये विकासात्मक कार्यातून चित्र पालटलेले दिसेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी व्यक्त केला. त्यांनी कार्ला येथील श्री एकवीरादेवीचे दर्शन घेतले. देवीचे धार्मिक पूजा विधी करून देवीला साडीचोळी अर्पण केली.
त्या म्हणाल्या की, या संदर्भात नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह बैठक घेतली आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने अनुमती दिलेली आहे. वन विभागाच्या जागेच्या संदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह बैठक घेणार आहे.