गुरुच असतात आपले खरे सांगाती ।

‘माझे सासरे श्री. प्रकाश करंदीकर यांचे एक शस्त्रकर्म होणार होते. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (माझी आई) माझ्या सासर्‍यांशी भ्रमणभाषवर बोलल्या. त्यामुळे माझ्या सासर्‍यांना त्यांचा आधार वाटला. त्या वेळी आमच्या कुटुंबातील अन्य सदस्यही उपस्थित होते. आमच्या कुटुंबाच्या वतीने मी कृतज्ञतारूपी कवितापुष्प श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ चरणी अर्पण करते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

भाग्य आमचे थोर इतुके ।
लाभला सत्संग गुरुमाईंचा (टीप) ।। १ ।।

सौ. सायली सिद्धेश करंदीकर

त्यांच्या दैवी वाणीतून ।
अनुभवला स्पर्श आम्ही प्रीतीचा ।। २ ।।

गुरुपदी त्या पोचल्या जरी ।
लक्ष असे त्यांचे आम्हा लेकरांवरी ।। ३ ।।

माऊली होऊन भेटल्या आम्हाला । |
गुरुरूपे त्याच आमचा सांभाळ करती ।। ४ ।।

अशीच सदैव राहो कृपा तुमची ।
गुरुच असतात आपले खरे सांगाती ।। ५ ।।

टीप – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

– सौ. सायली सिद्धेश करंदीकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१३.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक