मद्य उत्पादनावरच बंदी हवी !

किराणा दुकानांतून खुलेपणाने वाईन विक्री करण्याचा लहान मुले, विद्यार्थी आणि महिला यांच्यावर काय परिणाम होईल, याचा किंचित्ही विचार सरकारने केलेला नाही, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.

सरकारने किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्री करण्याचा घेतलेला निर्णय रहित करावा, या मागणीसाठी सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची जनजागृती फेरी !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वाईन विक्रीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी ! हा निर्णय रहित करण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

किराणा दुकानात वाईन विक्रीचा निषेध झाला पाहिजे ! – डॉ. अभय बंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

डॉ. अभय बंग पुढे म्हणाले, ‘‘वाईन निर्मितीसाठी लागणारी फळे ही केवळ २-३ जिल्ह्यांत होतात. त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांना त्याचा लाभ होईल, हा तर्क खोटा आहे.

संतवीर आणि ‘व्यसनमुक्त युवक संघा’चे संस्थापक ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अटक नाही ! – सातारा पोलीस

कोरोनाच्या काळात आंदोलन केल्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. ‘ते चौकशीला सहकार्य करत असल्यामुळे त्यांना अटक नाही – सातारा पोलीस

मंत्रीमंडळातील मूठभर आमदारांनी एकांगी निर्णय घेत महाराष्ट्रावर मद्यविक्रीचा निर्णय लादला ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर

राज्य सरकारच्या किराणा मालाच्या दुकानात वाईन ठेवण्याच्या निर्णयाच्या विरोधात ‘व्यसनमुक्त युवक संघा’च्या वतीने ३ फेब्रुवारी या दिवशी दंडवत-दंडुका आंदोलन करण्यात आले.

सुपर मार्केटमध्ये वाईन विकणे हा चिंताजनक विषय नाही ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लाखोंचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत असतांना दारू अशा प्रकारे सहजपणे उपलब्ध करून देणे म्हणजे जनतेला दारू पिण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन दिल्याप्रमाणे आहे, असेच जनतेला वाटते !

(म्हणे) ‘वाईन आणि दारू यांत जमीन-अस्मानाचा फरक !’ – अजित पवार, उपमुख्यमंत्री

हत्या, मारामार्‍या, आत्महत्या, कौटुंबिक हिंसा इत्यादी अनेक गोष्टींमागील मुख्य कारण असलेल्या मद्याचे हे एकप्रकारे समर्थन करणे नव्हे का ? केवळ महसुलासाठी अशा प्रकारची विधाने करून तरुण पिढीला आणखी व्यसनाधीन आणि विकृत करण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल.

आमचे संसार उघड्यावर येत असल्याने कृपा करून गावातील अवैध मद्यविक्री बंद करा !

महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारा प्रशासन नावाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?

किराणा मालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्रीचा सरकारचा निर्णय राष्ट्रघातक आणि समाजाला हानीकारक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला असलेला जनतेचा विरोध लक्षात घेऊन तो निर्णय रहित करावा !

हे समाजघातकी सरकार लवकर रसातळाला जावो !

सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुपर मार्केटमध्ये मद्यविक्रीसाठी अनुमती देण्यात आली आहे, असा समाजघातकी निर्णय घेणारे सरकार लवकर रसातळाला जावो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, अशी तीव्र उद्वीग्नता ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केली आहे.