महाराष्ट्रातील सुपर मार्केटमध्ये आता ‘वाईन’ मिळणार : राज्य सरकारचा निर्णय !

मद्यपींना प्रोत्साहन देऊन त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणारे सरकार स्वहस्ते जनतेला व्यसनाधीन होण्यास उद्युक्त करून अधोगतीकडे नेत आहे, असेच सामान्य जनतेला वाटते !

बनावट गुन्ह्यात ३ युवकांना अडकवून पैसे उकळल्याप्रकरणी सालेकसा (गोंदिया) येथील ५ पोलीस निलंबित !

जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील ३ युवकांना अवैध मद्यविक्रीच्या बनावट गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ५ पोलिसांचे निलंबन केले आहे.

लोकांची गर्दी होत असेल, तर मद्याची दुकानेही बंद करावी लागतील ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत असल्याने नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

‘महाराष्ट्र सोल्जर फोर्स’ (रेस्क्यु टीम) आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने विशाळगडाचे पावित्र्य राखले जाण्यासाठी पहारा मोहीम पार पडली !

विशाळगडासह जवळपास प्रत्येक गडाची ३१ डिसेंबरच्या आसपास अशीच स्थिती असते. ही स्थिती प्रशासन आणि नागरिक या दोघांसाठीही लज्जास्पद आहे !

सातारा येथे मद्यप्राशन करून वाहन चालवणार्‍या १२ जणांवर गुन्हे नोंद !

३१ डिसेंबर या दिवशी नववर्ष स्वागतासाठी मद्यप्राशन करून वाहने चालवली जातात. याचा पूर्वानुभव लक्षात घेता शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने पोलीस पथके निर्माण केली गेली.

(म्हणे) ‘आम्हाला मत दिल्यास २०० रुपयांची दारू ५० रुपयांत देऊ !’

काँग्रेस, तेलंगाणामधील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समिती आदी राजकीय पक्षांचे नाही, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असे आवाहन करतात, हे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित नाही !

‘हिल टॉप’, वागातोर येथे चालू असलेल्या छोट्या स्वरूपातील ‘सनबर्न’मध्ये कोरोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन

गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्याने सरकारने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.

हुमरमळा येथे मद्यासह २ कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या कह्यात

३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस पथक मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत होते. या वेळी हुमरमळा येथे महामार्गाच्या बाजूला एक कंटेनर उभा असल्याचे दिसले. त्या कंटेनरची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या मद्याचे अडीच ते ३ खोके सापडले.

नगर जिल्‍ह्यात आतापर्यंत ९०० कोटी रुपये महसूल जमा ! – राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाची माहिती

राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या भरारी पथकांनी ऑक्‍टोंबर २०२१ पर्यंत अवैध आणि बनावट दारू तयार करणार्‍यांवर धाड घातली. यामध्‍ये ९६२ गुन्‍हे नोंद  करून ८३० आरोपींवर कारवाई केली.

बांदा येथे २० लाख रुपयांच्या मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी एकाला अटक

सातत्याने कारवाई होत असतांनाही मद्याची अवैध वाहतूक करणार्‍यांना त्याचा धाक वाटत नसेल, तर पोलीस आणि प्रशासन यांनी कारवाईचा अन्य पर्याय शोधला पाहिजे अन्यथा आता चालू असलेली कारवाई हे एक ढोंग ठरेल !