चंद्रपूर येथे मद्याच्या दुकानासमोर चहाविक्री करून स्थानिक नागरिकांकडून रोष व्यक्त !

मद्याचे दुकान चालू करण्यास महापालिकेचे अधिकारी दुकान मालकांना सहकार्य करत असतील, तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना बडतर्फ केले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे.

बिहारमध्ये दारूबंदी असतांना दारू सहज उपलब्ध होते ! – केंद्रीय मंत्री पशुपती पारस

ज्या राज्यात दारूबंदी आहे, तेथे ती सहज उपलब्ध होते, हे जर केंद्रीय मंत्रीच सांगत असतील, तर राज्य सरकार काय करत आहे ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

महाराष्ट्रातील मद्यविक्रीत १७ टक्के वाढ !

मद्यसम्राटांसाठी युवापिढीला मद्यपी बनवून महसूल मिळवायचा कि युवा पिढीला सक्षम बनवायचे ? हे सरकारने ठरवावे. मद्याच्या विक्रीत होणारी वाढ, ही महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही !

मद्यांच्या दुकानांना महापुरुष आणि गड-दुर्ग यांची नावे देऊ नयेत ! – मुंबई महानगरपालिका

राज्यशासनानेही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा !

‘सुपर मार्केट’मध्ये ‘वाईन’ विक्री करण्याविषयी सरकारने हरकती आणि सूचना मागवल्या !

जनतेला व्यसनमुक्त करण्याऐवजी तिला व्यसनाधीन बनवणारा हा निर्णय सरकारने तात्काळ रहित करावा, अशीच सर्वसामान्य जनतेची मागणी आहे !

मुख्यमंत्री स्वतः मद्य घेत नाहीत, मग जनतेला का वाईन पाजत आहेत ? – रामदास आठवले, केंद्रीयमंत्री

२१ फेब्रुवारी या दिवशी बजाजनगर येथील आम्रपाली बुद्धविहारात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

‘वाईन’चे समर्थन करणारे खालील प्रश्नांची उत्तरे देतील का ?

धवलक्रांती झाली, हरितक्रांती झाली, तरी शेतकर्‍यांना सुखाचे दिवस का आले नाहीत ? आता मद्यक्रांतीतून शेतकर्‍यांच्या जीवनात कोणता पालट होणार आहे ?

जळगाव येथे अण्णा हजारे यांच्या ‘भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासा’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

हा निर्णय त्वरित रहित न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणास आणि आंदोलनास सर्व स्तरांतून पाठिंबा दिला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

‘व्यसनांधता’ सामाजिक अपराध आणि मानवाच्या सर्वनाशाचे मूळ !

लाखो देशवासियांच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्या किंवा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कोट्यवधी लोकांची आयुष्ये, घर परिवार, तसेच मुलांच्या विनाशाकरता उत्तरदायी असे व्यापारी आणि दारू विक्रते यांच्यावर मनुष्यवधाचे खटले चालवले पाहिजेत. त्यांना गजाआड ठेवले पाहिजे किंवा फासावर लटकावले पाहिजे.

८८ टक्के महिला म्हणतात, किराणा दुकानातील वाईन विक्रीचा निर्णय तात्काळ रहित करावा !

मद्याचे दुष्परिणाम जगजाहीर असतांनाही मद्य सहजरित्या उपलब्ध करून द्यायला निघालेल्या सरकारला महाराष्ट्रातील दारूबंदी विरोधात आंदोलने करणार्‍या महिलांच्या दुःखाची संवेदनशीलता जाणवणार का ?