गांभीर्याचा अभाव असलेल्यांना ओळखा !
‘राज्यशासनाला पैशांची पुष्कळ आवश्यकता आहे. जसे आधी मद्यपान करायचे, तसे लोक आताही करतच आहेत. त्यामुळे ढोंगीपणा करू नका. मद्यविक्री कायदेशीर करा’, असे ‘ट्वीट’ अभिनेते ऋषी कपूर यांनी केले आहे.
‘राज्यशासनाला पैशांची पुष्कळ आवश्यकता आहे. जसे आधी मद्यपान करायचे, तसे लोक आताही करतच आहेत. त्यामुळे ढोंगीपणा करू नका. मद्यविक्री कायदेशीर करा’, असे ‘ट्वीट’ अभिनेते ऋषी कपूर यांनी केले आहे.
दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव शिवारात आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या एका ‘हॉटेल’वर धाड टाकून ४ सहस्र ६४१ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी इस्टरसाठी ११ एप्रिल या दिवशी लोकांना त्यांच्या आवडीचे मद्य विकत घेता यावे, यासाठी काही कालावधीसाठी मद्याची दुकाने उघडी ठेवण्याची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.
येथे दळणवळण बंदीमुळे मद्य न मिळाल्याने त्रस्त झालेल्या एका ३५ वर्षीय व्यसनी तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. इतर वेळी हा तरुण प्रतिदिन २ ते ३ वेळा मद्य पिण्यासाठी जात होता; मात्र दळणवळण बंदी झाल्यानंतर त्याला मद्य न मिळाल्याने तो त्रस्त झाला होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात ‘दळणवळण बंदी’ घोषित केली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. असे असतांना केरळ राज्यात मद्यविक्री चालू रहाणार आहे; कारण केरळमध्ये मद्यासह सर्व प्रकारचे पेय पदार्थ जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत अंतर्भूत…