दोडामार्ग आय.टी.आय. येथील कोरोना उपचार केंद्र ग्रामीण रुग्णालयात हालवले

तातडीच्या उपचाराची आवश्यकता असल्यास सावंतवाडी किंवा ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात भरती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक

७ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे

कॅसिनो चालू करण्याची अनुज्ञप्ती त्वरित मागे घ्या !

शासनाने तरंगते कॅसिनो बंद न केल्यास कॅसिनोंच्या कार्यालयांसमोर तीव्र निदर्शने करण्यात येतील

पाकच्या ‘आय.एस्.आय.एस्.’शी संबंध असलेल्या ‘पी.एफ्.आय.’वर गोव्यात बंदी का नाही ? – प्रा. सुभाष वेलींगकर

प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ केली आहे.

भाजपचे गोवा प्रभारी सी.टी. रवि गोव्यात : म्हादईवर भाष्य करण्यास नकार

गोवा शासनाने म्हादई प्रश्‍नी कर्नाटक राज्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे.

गोव्यात शासकीय कर्मचार्‍यांची संख्या आवश्यकतेपेक्षा अधिक ! – ‘सीआयआय’ अहवाल

सत्तेवर आल्यावर काही लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मतदारसंघातील युवकांना रोजगार दिल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे, असे म्हटल्यास गैर नाही ! जनतेमध्येही शासकीय नोकरी मिळवण्यासाठी धडपड चालू असते. त्यासाठी आर्थिक व्यवहारही होतात !

आयुर्वेदीय वैद्यांना नाक, कान, गळा, डोळे, दात आणि हाडे यांच्यावर शस्त्रकर्म करण्याची केंद्र सरकारची अनुमती

केंद्र सरकारने आयुर्वेदीय वैद्यांना आता शस्त्रकर्म करण्याची अनुमती दिली आहे. आयुर्वेदातील पदव्युत्तर विद्यार्थी हे शस्त्रकर्म करू शकणार आहेत. भारतीय वैद्यकीय परिषदेने मात्र सरकारच्या या निर्णयाचा प्रखर विरोध केला आहे.

कार्तिकी एकादशीच्या कालावधीत ३ दिवस श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन बंद रहाणार

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ‘ऑनलाईन’ पद्धतीने ‘बुकींग’ करून आलेल्या भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे.

(म्हणे) ‘राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडा !’ – रझा अकादमी

मुसलमान त्यांची प्रार्थनास्थळे कशी निर्माण करतात, हे लक्षात येईल !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे शहरातील सर्व शाळा तूर्तास बंद

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद .