दोडामार्ग आय.टी.आय. येथील कोरोना उपचार केंद्र ग्रामीण रुग्णालयात हालवले

 दोडामार्ग – तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची परीक्षा असल्यामुळे त्या ठिकाणी मागील काही मास  चालू असलेले ‘कोविड सेंटर’ (कोरोना उपचार केंद्र) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात हालवण्यात आले आहे. एखाद्या रुग्णाला तातडीच्या उपचाराची आवश्यकता असल्यास त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय किंवा ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात  येणार आहे. अन्य रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय ठेवण्यात आला आहे.  आय.टी.आय.च्या परीक्षा त्याच केंद्रात घेण्याची सक्ती असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. ज्ञानेश्‍वर ऐवाळे यांनी दिली.