पाकच्या ‘आय.एस्.आय.एस्.’शी संबंध असलेल्या ‘पी.एफ्.आय.’वर गोव्यात बंदी का नाही ? – प्रा. सुभाष वेलींगकर

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्यावरील बंदीच्या वाढीवरून प्रश्‍न !

प्रा. सुभाष वेलींगकर

पणजी, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – गोवा शासनाने श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ केली आहे, तर मग पाकच्या ‘आय.एस्.आय.एस्.’शी संबंध असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (पी.एफ्.आय.) गोव्यात बंदी का घातली जात नाही ? असा प्रश्‍न प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रा. सुभाष वेलींगकर यांनी ट्वीट करून उपस्थित केला आहे.

गोवा शासन प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर वर्ष २०१४ पासून गोव्यात प्रवेशबंदी घालत आहे. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने यापूर्वी गोव्यात विविध शहरांमध्ये मोर्चे काढले होते, तसेच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने नुकतीच फोंडा येथे फ्रान्सच्या विरोधात निदर्शने केली होती.