औंध (सातारा) येथे १ लाखांची लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांना रंगेहात पकडले !

औंध (जिल्हा सातारा) येथील पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेेब नारायण जाधव यांना १ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले.

पुणे येथे लिपिकास लाच घेतांना अटक !

तक्रारदार महिला या शासकीय सेवक असून त्‍यांचे १ लाख ७ सहस्र रुपयांचे वैद्यकीय देयक होते. ती रक्‍कम मिळण्‍यासाठी गायकवाड याने लाचेची मागणी केली होती.

गुन्‍हा नोंद न करण्‍यासाठी पोलीस निरीक्षकांनी केली लाचेची मागणी !

सुधारण्‍यासाठी लाच घेणार्‍यांना निलंबित करून तात्‍काळ आणि कठोर शिक्षा करावी !

नाशिक येथे १५ लाखांची लाच घेतांना तहसीलदारांना अटक !

मुरूम उत्‍खननाविषयी पाचपट दंड आणि स्‍वामित्‍व धन जागाभाडे मिळून १ कोटी २५ लाख रुपयांचा दंड अल्‍प करण्‍यासाठी, तसेच स्‍थळ निरीक्षणासाठी १५ लाख रुपयांची लाच घेतांना येथील तहसीलादर नरेशकुमार बहिरम यांना अटक केली.

सोलापूर येथे १५ सहस्र रुपयांची लाच मागणारा पोलीस नाईक अटकेत !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र !
कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक असणार्‍या पोलिसांनी लाच घेणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय !

२ सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारतांना पोलीस हवालदाराला पकडले !

तक्रारदार यांच्‍याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्‍यात एका प्रकरणात अदखलपात्र गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. या गुन्‍ह्यात त्‍यांच्‍यावर प्रतिबंधात्‍मक कारवाई होऊ नये, यासाठी तक्रारदार यांनी पवार यांना विनंती केली होती.

फेरफार नोंद करण्‍यासाठी तलाठ्याने मागितली १० सहस्र रुपयांची लाच !

लाच घेणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

छत्रपती संभाजीनगर येथे १ लाखाची लाच घेणार्‍या पोलीस अधिकार्‍याला अटक !

फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेणारे पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.

पुणे येथील तत्कालीन उपायुक्त नितीन ढगे यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा नोंद !

भ्रष्ट अधिकार्‍यांना कशाचाच धाक उरला नाही, हेच यावरुन सिद्ध होते. देशाला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक !

पुणे महापालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यास लाच घेतांना अटक !

महापालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागातून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्‍यासाठी ‘मीटर रिडर’ कर्मचारी उमेश कवठेकर याला २५ सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारतांना अटक करण्‍यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभागात केली.