महसूल साहाय्यकाने लाच मागितल्याप्रकरणी त्याला अटक !

प्रतिकात्मक चित्र

नवी मुंबई – तहसील कार्यालयातील महसूल साहाय्यक किरण गोरे यांनी शेतीच्या संदर्भातील काम करण्यासाठी ‘काही तरी द्यावे लागेल’ असे सांगून सांगत १ लाख ३० सहस्र रुपयांची मागणी एका शेतकर्‍याकडे केली. शेतकर्‍याने याविषयी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पैसे घेतांना गोरे यांना रंगेहात अटक केली आहे.

भोगवटादार वर्ग २ ची भूमी भोगवटा वर्ग १ मध्ये करण्यासाठी ही लाच मागितली होती. या प्रकरणामुळे तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

संपादकीय भूमिका :

शेतकर्‍याकडे थेट लाच मागण्याचे धारिष्ट्य प्रशासकीय अधिकारी करतात. भ्रष्टाचाराची ही बजबजपुरी संपण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !