पेडणे ते काणकोण अर्ध्या घंट्यात पोचणारी रेल्वेसेवा चालू करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

राज्यातील रस्त्यावरील रहदारीचा ताण अल्प करण्यासाठी पेडणे ते काणकोण अर्ध्या घंट्यात पोचणारी रेल्वे सेवा चालू केली जाणार आहे. त्यासाठी मये, नेवरा आणि सारझोरा येथील रेल्वेस्थानकांची आवश्यकता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली.

गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी स्वतंत्र धोरण आखणार ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री

गोड्या पाण्यातील मासेमारीमुळे भोई आणि इतर समाजांतील मासेमारी करणार्‍या मासेमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी सक्षम धोरण आखण्याचा हेतू मत्स्य विभागाचा आहे.