प्रेमळ आणि इतरांना साहाय्य करणारे चि. अनमोल अरुण करमळकर अन् सेवेची तळमळ असणार्‍या आणि संतांप्रती भाव असणार्‍या चि.सौ.कां. श्रेया श्रीशैल गुब्याड !

चि. अनमोल करमळकर आणि चि.सौ.कां. श्रेया गुब्याड यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

इतरांना साहाय्य करणारे आणि सेवेची तळमळ असलेले चि. ओंकार कानडे अन् नेहमी आनंदी असणार्‍या आणि इतरांशी जवळीक साधणार्‍या चि.सौ.कां. मृण्मयी गांधी !

‘माघ कृष्ण द्वादशी (२५.२.२०२५) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारे चि. ओंकार राजेंद्र कानडे आणि चि.सौ.कां. मृण्मयी संतोष गांधी यांचा शुभविवाह मिरज येथे आहे. त्यानिमित्त त्यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या दैवी सत्संगात सर्व साधकांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

कैलास पर्वताचा भगवान शिवाप्रती प्रचंड भाव आहे; कारण ते साक्षात् भगवान शिवाचे नित्यधाम आहे. ते शिवाचे घर आहे. या पर्वताची निर्मळता आणि पावित्र्य यांमुळे साक्षात् भगवान शिव तेथे नित्य वास करतात. आपले हृदयमंदिरही ‘कैलास पर्वत’ बनवूया. त्यानंतर या हृदयमंदिरात साक्षात् भगवान शिव वास करू लागतील. 

डिसेंबर २०२४ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील संपूर्ण लादीचा गुळगुळीतपणा वाढण्यामागील कार्यकारणभाव !

‘व्यक्तीची आध्यात्मिक पातळी आणि आध्यात्मिक त्रास यांनुसार तो रहात असलेल्या वास्तूत सकारात्मक किंवा नकारात्मक वायुतत्त्व कार्यरत असते. ज्या वेळी वास्तूतील वायुतत्त्वाचे (सकारात्मक किंवा नकारात्मक) प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक वाढते, त्या वेळी वायुतत्त्वाचे स्थुलातील प्रमाण खोलीत विविध माध्यमांतून दिसू लागते.