
१. खोलीत वाढलेल्या वायुतत्त्वाचा परिणाम लादीवर होणे
‘व्यक्तीची आध्यात्मिक पातळी आणि आध्यात्मिक त्रास यांनुसार तो रहात असलेल्या वास्तूत सकारात्मक किंवा नकारात्मक वायुतत्त्व कार्यरत असते. ज्या वेळी वास्तूतील वायुतत्त्वाचे (सकारात्मक किंवा नकारात्मक) प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक वाढते, त्या वेळी वायुतत्त्वाचे स्थुलातील प्रमाण खोलीत विविध माध्यमांतून दिसू लागते. वास्तूत रहाणार्या व्यक्तीवर आक्रमण करण्यासाठी अनिष्ट शक्तींनी तीव्र त्रासदायक शक्तीयुक्त विषारी वायू सोडला असल्यास लादी भूमीला चिकटून न रहाता वर येणे, लाद्यांना तडा जाणे इत्यादी त्रास आढळतात. याउलट वास्तूत रहाणार्या व्यक्तीची साधना चांगली असल्यास क्रियाशक्तीयुक्त वायूमुळे लादी गुळगुळीत होणे, लादीचा उष्ण किंवा थंड स्पर्श अनुभवता येणे, असे पालट अनुभवायला येतात.

२. डिसेंबर २०२४ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील संपूर्ण लादीचा गुळगुळीतपणा वाढण्याचे कारण
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले जीवित रहाण्यासाठी त्यांच्या खोलीत प्राणशक्तीयुक्त वायू, तर समष्टी कल्याणासाठी क्रियाशक्तीयुक्त वायू यांचे प्रमाण वाढल्याने खोलीतील संपूर्ण लादीचा गुळगुळीतपणा वाढणे
काळचक्रामुळे विश्वाच्या तृतीय युद्धाकडे होत असलेल्या वाटचालीमुळे काळाची प्रतिकूलता वाढली आहे. यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना स्थुलदेहात राहून कार्य करण्यासाठी अधिक प्राणशक्ती व्यय करावी लागत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत प्राणशक्तीयुक्त वायु अधिक प्रमाणात कार्यरत झाला आहे.
याच प्रकारे काळाच्या प्रतिकूलतेचा परिणाम साधना करणार्या समष्टीवर होऊन विविध प्रकारांच्या आवरणामुळे (मायेचे आवरण, स्वभावदोषांचे आवरण, स्थान आणि प्रारब्ध यांचे आवरण इत्यादी) साधकांची साधना करण्याची क्षमता, म्हणजे क्रियाशक्ती उणावली आहे. समष्टीवरील हे विविध प्रकारचे आवरण नष्ट करण्यासाठी आणि साधनेची खरी तळमळ असलेल्या जिवांना क्रियाशक्ती प्रदान करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत क्रियाशक्तीयुक्त वायू अधिक प्रमाणात कार्यरत झाला आहे.
वरील दोन्ही प्रकारच्या वायूंचे कार्य ‘सगुण शक्ती प्रदान करणे’, असे आहे. यामुळे प्राणशक्तीयुक्त वायू आणि क्रियाशक्तीयुक्त वायू दोन्हींच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे, म्हणजे काळानुसार व्यष्टी आणि समष्टी दोन्ही स्तरांवर सगुण तत्त्वाची आवश्यकता असल्याने खोलीतील संपूर्ण लादीच्या गुळगुळीतपणात (सगुण अनुभूतीत) अधिक वाढ झाली आहे.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. (१६.१२.२०२४)
|